जकार्ता – इंडोनेशियातील पश्चिम जावा प्रांतात नदी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली होती. या ठिकाणी शाळेच्या सहलीदरम्यान २१ विद्यार्थी बुडाल्याची धक्कादायक घटना घडली. यातील 10 जणांना वाचवण्यात आल्याची माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली आहे. शनिवारी (दि.१५ ऑक्टो.) ही दुर्घटना घडली.

REENTS द्वारे Adeng Bustomi
इस्लामिक ज्युनियर हायस्कूलचे 150 विद्यार्थी शुक्रवारी सिलेयूर नदीच्या काठावर स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते. त्यापैकी 21 जण पाण्यात घसरले.

REENTS द्वारे Adeng Bustomi
हवामान चांगले होते आणि पुराचा धोकाही नव्हता. जी मुलं बुडाली त्यांनी एकमेकांचे हात धरले होते. त्यापैकी एकजण घसरला आणि बाकीचे त्याच्या मागोमाग पडले, अशी माहिती देडेन रिद्वांस्याह यांनी दिली. ते बँडंग सर्च अँड रेस्क्यू संस्थेचे प्रमुख आहेत.

REENTS द्वारे Adeng Bustomi
संबंधित घटना कळल्यानंतर स्थानिक रहिवासी आणि बचाव पथकाला 10 विद्यार्थ्यांना वाचवण्यात यश आलं. त्यांना तत्काळ जवळच्या रुग्णालयात पाठवण्यात आले.
Esakal