तरवाडे (ता.चाळीसगाव) : तरवाडे येथील २३ वर्षीय तरूणाचा पाण्यात बुडून (Drowning) मृत्यू (Death) झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली असून याप्रकरणी ग्रामीण पोलिसात अकस्मात (Police) मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा: जिल्हा बँक निवडणूकःआमदार अनिल पाटील यांची उमेदवारी दाखल

याबाबत वृत्त असे की, चाळीसगाव तालुक्यातील तरवाडे येथील रविंद्र अशोक गरूड (वय-२३) या तरूणाचा विहीरीत पाय घसरुन पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता रविंद्र गरुड याचे शव चाळीसगाव ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले असून वैद्यकीय अधिकारी यांच्या खबरीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास नितीन सोनवणे हे करीत आहेत.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here