गेल्या IPL मध्ये सर्वात वाईट कामगिरी करणारा संघ म्हणून टीका झालेल्या CSK ने यंदा तुफानी कमबॅक केलं आणि स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. स्पर्धेचे चौथ्यांदा विजेतेपद पटकावल्यानंतर धोनीची पत्नी साक्षी हिने त्याला आलिंगन देत त्याचं अभिनंदन केलं. त्यानंतर आता धोनी पती-पत्नींकडे गूड न्युज असल्याची चर्चा रंगली आहे.

धोनीच्या संघाने स्पर्धा जिंकल्यानंतर CSK च्या खेळाडूंच्या पत्नी आणि गर्लफ्रेंड्स मैदानात साऱ्यांचे अभिनंदन करण्यासाठी आल्या. त्यावेळी चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याची पत्नी साक्षी आपली चिमुरडी झिवा हिला घेऊन मैदानात आली.
त्यानंतर काही वेळाने रैनाची पत्नी प्रियांका ही देखील मैदानात आली आणि तिनेही साऱ्यांचे अभिनंदन केले.
या साऱ्या गोंधळात आता धोनीची पत्नी साक्षी ही गरोदर असल्याची चर्चा रंगली आहे.
AK FAN (@Thalajithfanboy) या युजर नेमच्या अकाऊंटवरून ट्वीट करण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की साक्षी धोनी ४ महिन्यांची गरोदर असून रैनाची पत्नी प्रियांका हिने या माहितीला दुजोरा दिला आहे.
त्यानंतर अनेक लोकांनी या संबंधीचे ट्वीट केले. साऱ्यांनी प्रियांका रैना हिने साक्षी गरोदर असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिल्याचे म्हटले आहे. त्यानंतर सोशल मीडियावर साक्षी धोनी प्रेग्नंट असा हॅशटॅगही काही काळासाठी ट्रेंड होत असल्याचे दिसून आले आहे. अनेक फॅन्स आणि ट्वीटर युजर्सने या संबंधीचे ट्विट्स केली.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here