राज्याच्या आरोग्य विभागाच्या भरतीत गेल्या महिन्यात झालेल्या गोंधळाने विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला होता. ऐनवेळी परिक्षा रद्द करण्यात आल्यानं विद्यार्थ्यांना आर्थिक आणि मानसिक त्रासाला सामोरं जावं लागलं होतं. त्यानंतर सरकारच्या गलथान कारभारावर मोठ्या प्रमाणात टीका झाली. मात्र आता पून्हा एकदा तोच गोंधळ झाल्याचं पाहायला मिळतंय, कारण रविवारी होणाऱ्या परिक्षेत देखील गलथान कारभारामुळे विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागतोय. या परिक्षेसाठी देखील हॉलतिकिटचा घोळ कायम आहे. अशाच एका विद्यार्थ्यांनं आपल्याला दोन हॉलतिकीट मिळल्याचं सांगितलं.
“माननीय टोपे साहेब, मी राहतो पुण्यात. मी सेंटर पुणे निवडलं होतं, मात्र मला होन हॉलतिकीट आले आहेत. माझा नंबर जळगाव आणि कोल्हापूरला लागला आहे. एकाच दिवळी एकाचवेळी होन पेपर आहे आता मी काय करु?” असा प्रश्न अक्षय दिघे या विद्यार्थ्यानं विचारलाय.

हेही वाचा: आरोग्यसेवा भरतीत पुन्हा तोच गोंधळ; प्रशासनाची बौद्धिक दिवाळखोरी
तसंच पुढे तो विद्यार्थी असंही म्हणाला की, “एक काम करा, एक पेपर सकाळी व दुसरा दुपारी ठेवा आणि मला एक हेलिकॉप्टर द्या, म्हणजे मी दोन्ही पेपर देऊ शकेल.” परिक्षेच्या या गलथान कारभारावरून आपल्यावा हसावं की रडावं हे देखील कळत नसल्याच्या भावना या विद्यार्थ्यांनं व्यक्त केल्या.
दरम्यान, आरोग्य विभागाच्या या परिक्षेसाठी बहुतेकांना दोन वेगवेगळ्या केंद्राचे हॉलतिकीट मिळाले, तर काहींना एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या जिल्ह्यात परीक्षा केंद्र देण्यात आले आहे.
Esakal