मनाला ताजतवानं, रिफ्रेश करण्यासाठी ब्रेक हा हवाच. निर्सगाच्या सानिध्यात कुटुंबीय किंवा आवडीच्या व्यक्तींसह व्यतीत केलेल्या क्षणांचा आनंद काही वेगळाच असतो. प्रत्येक जण आपल्या ऐपतीप्रमाणे पर्यटनाचं (Tourism) ठिकाण ठरवत असतो. सर्वसामान्यांप्रमाणे बॉलिवूडमधले (Bollywood) सेलिब्रिटी सुद्धा व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून पर्यटनाला जात असतात. सध्या बहुतांश बॉलिवूड कलाकारांची पहिली पसंती मालदीव्सला (Maldives) आहे. हे सेलिब्रिटी सोशल मीडियावरुन (Social media) मालदीव्सच्या सुंदर किनाऱ्यावर व्यतीत केलेल्या क्षणांचे फोटो पोस्ट करत असतात.
आता बॉलिवूडचा स्टार शाहीद कपूर पत्नी मीरा आणि मुलांसह सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी मालदीव्सला गेला आहे. सध्या शाहीद आणि मीरा दोघेही त्यांच्या इन्स्टा अकाऊंटवरुन मालदीव्समधल्या सुट्ट्यांचे फोटो पोस्ट करत आहेत. शाहीद आणि मारी दोघेही मालदीव्सच्या सोनीव्हा रिसॉर्ट्समध्ये उतरले आहेत. मालदीव्समधलं हे एक पंचतारांकीत सुविधा देणारं आलिशान रिसॉर्ट आहे. जीक्यू वेबसाइटने हे वृत्त दिले आहे.
हेही वाचा: “…किती हा भाबडेपणा?”; फडणवीसांची पवारांवर खोचक टीका

या रिसॉर्टमधल्या काही स्लाईड्स थेटे समुद्रामध्ये जातात. जोडपी आणि कुटुंबासाठी छोटे-छोटे व्हिला बांधण्यात आले आहे. सोनीव्हा रिसॉर्टमध्ये व्हिलाचे भाडे थोडेथोडके नाही, तर लाखांच्या घरात आहे. या रिसॉर्टच्या व्हिलामध्ये एका रात्रीचे भाडे १.४३ लाख रुपयापासून २.७ लाख रुपयापर्यंत आहे. शाहीद आणि मीरा दोघांना समुद्रकिनारा आवडतो. मुंबईत जुहू समुद्र किनाऱ्याजवळ त्यांचे आलिशान अपार्टमेन्ट आहे.
Esakal