केरळच्या दक्षिण आणि मध्य भागात पावसाने थैमान घातलंय. अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती असून भूस्खलनाच्या घटनाही घडल्या आहेत.
आतापर्यंत यामध्ये १८ जणांचा मृत्यू झाला आहे. कोट्टयम आणि इडुक्कीच्या पर्वतीय भागात भूस्खलन झाल्यानं २२ जण बेपत्ता असल्याची माहिती समोर येत आहे.
सरकारने या आपत्तीत सशस्त्र दलाची मदत घेतली आहे. ११ एनडीआरएफ पथके, दोन लष्करी आणि दोन डीएससी पथकांसह केंद्रीय पथकांकडून बचावकार्य सुरु आहे.
अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण आणि मध्य भागात ११ पथके तैनात करण्यात आली आहेत.
कोट्टायम जिल्ह्यातही अतिवृष्टी सुरु आहे. जिल्ह्यातील कूट्टीक्कल इथं भूस्खलन झाले असून आणखी तीन मृतदेह सापडले आहेत. या दुर्घटनेत मृतांची संख्या ९ वर पोहोचली आहे.
ढिगाऱ्याखाली आणखी काही लोक गाडले गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी एनडीआरएफच्या पथकासह इतर बचावपथके कार्यरत आहेत.
अतिवृष्टीमुळे कोट्टयम, पथानामथिट्टा आणि इडुक्कीला मोठा फटका बसला आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here