तु्म्ही कधी डेटवर गेला आहात का? असा प्रश्न विचारला की अनेकजाणांच उत्तर हो असेच येईल.डेटवर गेल्यावर पार्टनरसोबत निवांत वेळ घालवून आयुष्याची स्वप्न रंगवणे अनेकांना आवडते. काहींची डेट सक्सेसफुल होते. तर काहींच्या डेट्सची संख्या वाढती राहते.

तर ज्यांची डेट सक्सेफुल होते, असा तो आणि ती लग्न करतात. पण आधी जसे एकमेंकांना वेळ देता येत होता तसा वेळ देणे कामाच्या धबडग्यात जमतंच असं नाही. रूटीन सुरू राहतं. पण त्यंच्या गप्पा मात्र फोनवर होतात. अशावेळी काहीतरी राहून गेलंय, हरवतय असं वाटतं. काय करावं, यासाठी पुन्हा दोधं एकमेकांना कसे वेळ देऊ शकतील. तर, यासाठी सुप्रसिद्ध लेखक रॉबिन शर्मा याने त्याच्या एका पॉडकास्टमध्ये प्रायव्हेट डेटवर जाण्याचा सल्ला दिला आहे. यातून हे दिसतं की फक्त प्रेमात पडलेले लोकच डेटवर जात नाहीत तर तुमचं नात खुलवण्यासाठी अशा डेटवर जाणं गरजेचं ठरतं. महिन्यातून एकदा किंवा दोनदा करावी लागणारी ही डेट तुम्ही कशाप्रकारे करू शकता हे बघूया.

हेही वाचा: INSTAGRAM वर फूड फोटो करताय शेयर , वाढेल वजन!

नवरा- बायको

रोजच्या कामाच्या व्यापात बायकोशी पूर्वीइतका संवाद होतोय का तुमचा? तिही घर ऑफिस अशी दुहेरी कसरत पार पडताना तुमच्याशी चार गोष्टी वेगळ्या बोलतेय का? विचार करावा लागतोय ना? अशावेळी तुमच्या दोघांच्या नात्याला अधिक समजून घेण्यासाठी दोघे ठरवून प्रायव्हेट डेटवर जाऊ शकता. तिला येत असलेल्या समस्या, दोधांच्या वागण्यातलं काय खटकतय,एकमेकांना आणखी वेळ कसा देऊ शकाल, नवीन नाटक- सिनेमा अशा गोष्टींवर चर्चा करत हा वेळ चांगला व्यत्तित करता येऊ शकतो. यामुळे तुमचं नात अधिक घट्ट होईल.

मुलांनाही व्यक्त होऊ द्या

तुमच्या मुलाला त्याचे काही सिक्रेट्स शेअर करायचे असतील, त्यांच्या वाढीच्या वयात त्यांना काही तणाव असेल तर त्यांना कदाचित घरी सर्वांसमोर सांगायाला कठीण जात असेल. अशावेळी मुलांना बाहेर नेऊन त्यांना मोकळेपणाने बोलू द्या. मुलांबरोबरची ही प्रायव्हेट डेट त्यांना व्यक्त संधी देणारी ठरू देत. त्यातून तुमचे आणि मुलांचे नाते घट्ट होण्यास मदत होईल. आपले म्हणणे ऐकून घेतले जात आहे यांनी तीसुद्धा मोकळी होतील.

आई-वडिलांना द्या वेळ

जर तुमचे आईवडील एकाच शहरात पण वेगळे राहत असतील तर त्यांना तुम्ही पाहिजे तसा वेळ देऊ शकत नाही. अशावेळी तुमचे संबंध अधिक घट्ट करायचे असतील तर आई वडिलांसह डेटवर जा. तिथे त्यांना आवडीचा पदार्थ खायचा प्रयत्न करा. त्यांना -तुम्हाला येणारया अडचणी, त्यांचे प्रश्न समजून घ्या. असे केल्याने मुलांचे आपल्याकडे लक्ष आहे, ही जाणीव आई वडिलांना सुखावह ठरते. नाते घट्ट होण्यासाठी याचा फायदा होतो.

सर्वोत्तम मित्र

आपल्या बेस्ट फ्रेंडला रोजच्या बिझी शेड्युलमुले वेळ देणं कमी होतं. तुम्ही कधी फोन केलात तर जुन्या आठवणी रंगतात. अशावेळी या नात्याला वेळ द्यावा, असं वाटत असेल तर ठरवून डेटवर जा. त्यातून तुमची मैत्री अधिक वाढेल. एखाद्या गोष्टीवर चर्चा होऊन त्याचं मत तुम्हाला कळेल. यातून तुमच्या विचारसरणीत बदल होऊ शकतो. काही गोष्टींवर नवा मार्ग मिळू शकतो.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here