नागपूर : आपण आपल्या देशात आयकर भरतो. पाणीपट्टी, घरपट्टी तसेच इतर विविध माध्यमातून कर वसूल केला जातो. परंतु, तुम्ही कधी उन्हासाठी किंवा सावलीसाठी कर भरला आहे का? नाही ना, पण काही देशांमध्ये यासाठीही कर घेतला जातो. जगभरातल्या अशाच काही विचित्र करपद्धतींविषयी जाणून घेऊ या…

अमेरिकेतल्या ऑर्कन्स राज्यात शरीरावर टॅटू गोंदवल्यास सहा टक्के कर भरावा लागतो.
स्पेनमधल्या बॅलरिक बेटांवर २०१६ पासून सन टॅक्स वसूल केला जातो. युरोपातल्या देशांमध्ये सूर्यप्रकाश खूप कमी काळ असतो. म्हणूनच मुबलक सूर्यप्रकाश असणाऱ्या या ठिकाणी पर्यटकांची बरीच गर्दी होते. त्यांच्याकडून हा कर घेतला जातो.
अमेरिकेत २०१० पासून टॅनिंग टॅक्स वसूल केला जातो. पाश्‍चिमात्य देशांमध्ये त्वचेच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत चालले आहे. या कर्करोगाला आळा घालण्यासाठी टॅनिंग कर वसूल केला जात आहे.
हंगेरीत २०११ पासून डबाबंद खाद्यपदार्थांमध्ये साखर आणि मिठाचे प्रमाण जास्त असणाऱ्या कंपन्यांकडून कर वसूल केला जातो.
अमेरिकेतल्या अलबामा राज्यात पत्त्याचा कॅट खरेदी करणाऱ्यांकडून कर वसूल केला जातो.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here