नागपूर : वजन कमी करण्यासाठी नेमकं काय करायच, असा प्रश्न वजन कमी करणाऱ्या प्रत्येकालाच पडलेला असतो. विविध प्रकारची डाएट्स, व्यायामप्रकार, वजन कमी करणाऱ्या पावडर्स यापैकी नेमके काय निवडायचे याबाबत गोंधळ उडलेला असतो. परंतु, काही उपायांमुळे तुमचे वजन कमी होऊ शकते. हे उपाय प्रभावी असल्याचे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाले आहे. अगदी सहज सोपे हे उपाय तुम्हीही करून बघू शकता.

वजन कमी करण्यासाठी शरीरातला ओलावा टिकवून ठेवणे गरजेचे आहे. यासाठी पुरेसे पाणी प्या. पाणी प्यायल्यानंतर पुढच्या एक ते सव्वा तासात चयापयच क्रियेचा वेग २४ ते ३० टक्क्यांनी वाढतो. यामुळे अधिक कॅलरी खर्च होतात. जेवणाच्या अर्धा तास आधी अर्धा लीटर पाणी प्यायल्यामुळे तुलनेने कमी अन्न खाल्ले जाते, असे काही संशोधनांमधून समोर आले आहे. अशा पद्धतीने पाणी पिणाऱ्यांचे वजन पाणी न पिणाऱ्यांच्या तुलनेत झपाट्याने कमी झाल्याचे दिसून आले.
व्यायामाआधी ब्लॅक कॉफी पिणे चांगले असते असे म्हटले जाते. कॅफेनमुळे चयापचय क्रियेचा वेग वाढत असल्याचे सिद्ध झाले आहे. यामुळे कॅलरीही लवकर खर्च होतात. कॉफीत साखर किंवा अधिक कॅलरीयुक्त घटक मिसळू नका.
साखरेमुळे वजन वाढते. त्यामुळे साखर असणारे पदार्थ खाऊ नका. आहारातले साखरेचे प्रमाण कमी करा
काही मसाल्यांमुळे चयापचय क्रियेला गती मिळते. त्यामुळे आहारात मसाल्यांचा समावेश करता येईल
अंडी खाण्याचे बरेच लाभ आहेत. न्याहरीला अंडी खाल्ल्यानंतर पुढचे ३६ तास कमी भूक लागते. यामुळे या काळात शरीरात जाणाऱ्या कॅलरींचे प्रमाण ३५ टक्क्यांनी घटते. शाकाहारींनी आहारात प्रथिनयुक्त पदार्थांचे प्रमाण वाढवावे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here