वाकड : गेल्या दीड वर्षांपासून कोरोनामुळे सर्वांना चाकोरीबध्द जीवन जगावे लागत आहे. याशिवाय सध्याच्या स्पर्धेच्या युगात, दगादगित-धावपळीत प्रत्येकजण बिजी आहे. कोणालाही वेळ नाही असे असताना वाकडमधील सुकासा या उच्चभ्रू सोसायटीत शनिवारी (ता. १६) जेवणावळीच्या पंगती पाहायला मिळाल्या. श्रीमंती, मोठेपणा, हुद्दा, पदवी, बडेजाव सोडून सर्वजण जमिनीवर एकत्र आले निमित्त होते जागतिक अन्न दिवसाचे अन दसऱ्याच्या सणाचे.

सूकासा सोसायटीतील रहिवाशांनी एक दिवस
चुलबंद या आगळ्या वेगळ्या उपक्रमाची सुरुवात अन्न दिवसानिमित्त केली. सर्वकाही सोडून रहिवाशी एकवटले. सुंदर संकल्पना, त्यासाठी लागणारी व्यवस्थापनाची तयारी आणि त्याला दिलेले अंतिम स्वरूप वाखाण्यासारखे होते. चूलबंद आमंत्रणाने सर्वजण आतुर झाले. हे आमंत्रण फक्त रहिवाशांनाच नव्हते तर सर्व कामगार, घरकाम करणाऱ्या महिला-पुरुष व त्यांच्या परिवारालापण होते. त्यामुळे हा आनंद मिळवून जणू प्रत्येकाने दसऱ्याचे खरे-खुरे सोने लुटले.

आयटी कंपनीत सीईओ असलेल्या अविनाश साहू यांनी ही संकल्पना मांडली. नितीन महाजन यांनी जेवण बनविण्याची तयारी दाखविली. आर्थिक नियोजन केले ते सुनील अगरवाल यांनी. सर्व कामांना हाथभार लावला तो महिला रहिवाशांनी. संपूर्ण दिवस भांडे साफ करणे, फळ भाज्या निवडून त्यांची साफ सफाई, कटिंग करीत चविष्ट जेवण बनविण्याची लगबग सुरू झाली. जो-तो हातोपती कामे करू लागला. एवढेच नव्हे तर ते लोकांना वाढणे इत्यादी सर्व केले ते रहिवाश्यांनीच. ना कुणा कामगाराची मदत घेतली ना कुठल्या आचाऱ्याची.
हेही वाचा: “तेव्हा हे चड्डी-टोपीत होते”; अमोल मिटकरींची चंद्रकांत पाटलांवर टीका
सुमारे पाचशेहुन अधिक लोकांनी जेवणावर ताव मारीत समाधानाचा आणि आनंदाचा ढेकर दिला. मजा-मस्करीसह अंगती-पंगती झाल्या तेही सर्व कोरोना नियमांचे पालन करून. करोनानंतरच्या काळात पुन्हा आपापल्या परंपरा, संस्कृतीचा शोध घेण्याचा हा एक छोटा प्रयत्न व प्रत्येकाच्या खेड्यातील गावच्या जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला. शेवटी, रात्री १० वाजता अतिरिक्त जेवण रॉबिन हूड आर्मीच्या मदतीने दोनशेहून अधिक गरजू व्यक्तींना देण्यात आले. गप्पांचा फड जमवित सर्वांनी ऐकमेकांना सोने देऊन दसऱ्याचाही डबल आनंद लुटला.
कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून सर्वजण
“चौकटीतले जीवन जगत आहेत. हिंडण्या फिरण्यावर मर्यादा आल्या. सार्वजनिक कार्यक्रमांना मुकावे लागले त्यामुळे सर्वांना एकत्र करीत गप्पाटप्पा, संवाद साधण्यासाठी व सुख-दुःखाची देवाण घेवाण करण्यासाठी खऱ्या अर्थाने अन्न दिवस साजरा केल्याचा आनंद आहे.”
– सुधिर देशमुख, अध्यक्ष, सुकासा सोसायटी वाकड
Esakal