खडकवासला – दसरा शुक्रवारी, शनिवार व रविवार अशा सलग तीन सुट्ट्या असल्याने सिंहगड खडकवासला चौपाटी परिसरात पर्यटकांनी गर्दी केली होती. सगळ्यात जास्त गर्दी आज रविवारी झाली होती. या तीन दिवसात सुमारे १२ हजारापेक्षा जास्त पर्यटक गडावर आले होते.

सिंहगडावर या तीन दिवसात सुमारे एक हजार ९५३ दुचाकी आल्या होत्या. यातून एका दुचाकीने प्रत्येकी दोन असे सरासरी तीन हजार ९०६ पर्यटक गडावर पोचले होते. तर एक हजार ४०२ मोटारी गडावर आल्या होत्या. एका मोटारीतून सरासरी पाच व्यक्ती गडावर आल्या होत्या असे गृहीत धरले तर सह हजार दहा पर्यटक गडावर आले होते.

सिंहगडावर खासगी जीप वडाप देखील आहे. सुमारे ४० जीप आहेत. त्यांच्या आज प्रत्येकी दोन- दोन खेपा झाल्या. तर शनिवारी रविवारी प्रत्येकी एक- एक खेप झाली. तर एका जीपमध्ये सात- आठ प्रवाशी गृहीत धरले. १६० खेपातून एक हजार २८० पर्यटक गडावर पोचले. असे मिळून १२ हजार १९६ प्रवाशी पोचले. असा साधारण अंदाज आहे.

हेही वाचा: घरी परतणा-या मायलेकावर काळाने घातला घाला; चिरडून दोघांचा अंत

“कोरोनाच्या प्रादुर्भाव कमी झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने मंगळवारी १२ सिंहगड पर्यटकांच्यासाठी सुरू झाला. पहिल्या आठवड्यात पर्यटकांची संख्या वाढत आहे. उपद्रव शुल्क नाक्यावर गडावर जाणाऱ्यांना कोरोनाबाबतची नियमावली पाळण्याचे आवाहन पर्यटकांना केले जात आहे.”

– प्रदीप संकपाळ, वन परिक्षेत्र अधिकारी भांबुर्डां पुणे

रविवारी झाली गर्दी

रविवारी- १७ ऑक्टोबर

दुचाकी १२१९

चारचाकी ५२४

वडाप- ६४०

अंदाजे एकूण पर्यटक पाच हजार ६९८

शनिवारी १६ ऑक्टोबर

दुचाकी- ५५७

चारचाकी ३२६

वडाप- ३२०

अंदाजे एकूण पर्यटक तीन हजार ०८४

शुक्रवारी १५ ऑक्टोबर

दुचाकी १६५,

चारचाकी ५५२

वडाप- ३२०

अंदाजे एकूण पर्यटक तीन हजार ४१०

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here