Ban Pak Cricket Trends ओमानच्या मैदानातून क्वॉलिफायर राउंडच्या लढतीने टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात झाली आहे. कोरोनाच्या संकटामुळे भारतात होणारी स्पर्धा युएई आणि ओमानमध्ये घेण्यात येणार आहे. स्पर्धा परदेशात होत असली तरी या स्पर्धेचे यजमानपद भारताकडेच आहे. क्वॉलिफायर ग्रुप राउंडच्या लढतीनंतर 23 आक्टोबरपासून ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील लढतीने Super 12 Group च्या लढती सुरु होतील. 24 आक्टोबरला भारत आणि पाकिस्तान यांच्यात स्पर्धेतील हायहोल्टेज सामना रंगणार आहे.

या सामन्यापूर्वी सोशल मीडियावर #ban_pak_cricket! ट्रेंड चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा एकदा दहशतवाद्यांच्या कुरापतीच्या घटना समोर येत आहेत. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानला बॅन करण्याची मागणी सोशल मीडियावर जोर धरत आहे. एका नेटकऱ्याने राष्ट्र प्रथम असा उल्लेख करत भारतीय संघाने पाकिस्तान विरुद्ध खेळून नये, अशा भावना व्यक्त केल्या आहेत. यात त्याने आयसीसी, बीसीसीआय आणि सौरव गांगुली यांना टॅग केल्याचे दिसते. भारतीय चाहत्यांकडून या संदेशाशी मिळत्या जुळत्या प्रतिक्रिया उमटत असताना पाकिस्तान समर्थक मात्र आपल्या परिने तर्क लावताना दिसते.

हेही वाचा: भारत-पाक लढाई पूर्व वातावरण कडक; बाबराला धमकी

भारतीय संघ पाकिस्तान विरुद्ध खेळायला घाबरतोय, असे म्हणताना दिसते. एका पाकिस्तानी समर्थकाने 2017 च्या आयसीसी ट्रॉफीच्या फायनलमधील भारत-पाकिस्तान स्कोअर कार्ड शेअर करत या कारणामुळे भारतीय पाकिस्तानला बॅन करा असे म्हणत असल्याचा अजब दावा करताना दिसते. वर्ल्ड कपच्या इतिहासात आतापर्यंत एकदाही भारतीय संघाने पाकिस्तानला जिंकू दिलेले नाही. त्यामुळे त्यांचा हा दावा फोल असाच आहे.

हेही वाचा: भारतानं पाकिस्तान सोबत खेळू नये;सोशल मीडियावर बहिष्काराची मागणी;पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर रंगणाऱ्या चर्चेचा सामन्यावर परिणाम होईल का?

भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावपूर्ण परिस्थितीमुळे दोन्ही देशांतील क्रिकेटमध्ये आधीपासून मोठी दरी निर्माण झाली आहे. दोन्ही संघातील द्विपक्षीय सामने कधीचे थांबले आहेत. पाकिस्तान खेळण्यास कायमच उत्सुकता दाखवत असते. दहशतवादी कृत्याचा दाखला देत भारत सरकारने कठोर भूमिका घेत पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळणं थांबवलं आहे. आयसीसीच्या स्पर्धेतच हे दोन संघ समोरा-समोर येतात. यापूर्वी इंग्लंडमध्ये रंगलेल्या वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी भारतात दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यातील पाकिस्तान कनेक्शनमुळे भारताने पाकिस्तान विरुद्ध खेळू नये अशी चर्चाही रंगली. पण आयसीसीच्या स्पर्धेत सामना तसा सोडता येत नसल्यामुळे हा सामना नियोजित वेळेनुसार झाला आणि भारतीय संघाने आपला विजय रुबाब कायम ठेवला. आगामी स्पर्धेतही असेच चित्र पाहायला मिळू शकते.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here