वयाच्या चाळीशीनंतर प्रत्येक स्त्रीला मेनोपॉजला सामोरे जावे लागते. मेनोपॉज हा आजार नसून स्त्रीच्या शरीरात होणारा मोठा बदल आहे, पाळी बंद होण्याचा काळ. पाळी येण्यापूर्वी जशी मुलींची घालमेल असते त्यापेक्षा दुप्पट बदल शरीरात होणार असतात.निसर्गचक्राचा हा भाग प्रत्येकीच्या आयुष्यात येणार असतो. हे स्विकारून वयाच्या पस्तीशीनंतर शरीरातील बदलांना आनंदाने स्विकारण्याची तयारी केली पाहिजे.
पाळी येणे बंद झाल्यास
40-42 वयात स्त्रीला एक वर्षभरात पाळी आलीच नाही तर तिला मेनोपॉज आला असे म्हणता येऊ शकते. अशी लक्षणे आढळल्यास, त्याची योग्य शहानिशा करण्यासाठी स्त्रीरोग तज्ज्ञांना भेटून हा बदल मेनोपॉजचा आहे का याची खात्री करावी. अशी पाळी बंद होण्याआधी काही वर्षे आधीपासूनच स्त्रियांच्या शरीरात त्या दृष्टीने काही बदल घडायला लागतात. या काळाला ‘पेरीमेनोपॉजल पिरीयड’ म्हणतात.

मुलगी-कालावधी
ही आहेत लक्षणे
1) मासिक पाळी अनियमित होते.
2) काही काळानंतर पाळी येणे बंद होते.
3) मानसिक स्थितीत खूप बदल होतात. अनेकदा कारण नसताना निराशा येते.
4) थकल्यासारखे वाटते.

रजोनिवृत्ती
Hot flashes चाही त्रास
रजोनिवृत्तीच्या काळात छातीत, चेहर्यावर किंवा मानेच्या भागात अचानकच गरम झळा आल्यासारखे वाटते. त्याला Hot flashes म्हणतात. यावेळी शरीराचे तापमान वाढून शरीर लालसर झाल्यासारखे वाटते. अचानक हृदयाची धडधड वाढते, घाम खूप येतो, कधी रात्री झोपमोड होते, योनीमार्ग कोरडा पडून शारिरिक संबंधात त्रास होतो, पचनशक्ती मंदावते, पोट गच्च दुखते, त्वचेवर परिणाम होतो. अशी लक्षणे Hot flashesची आहेत असे समजावे. पण, रोज भरपूर व्यायाम केल्यास, संतुलित व पोषक आहार घेतल्यास, मन शांत ठेवल्यास ही लक्षणे कमी होऊ शकतात.
Esakal