एकदा प्रेमात पडल्यावर स्वर्ग थिटा झाल्यासारखा वाटतो. सतत त्याच व्यक्तीचा विचार मनात असतो. तिच्या-त्याच्यासोबत सारखा वेळ घालावावा, असं वाटतं. बरं एकमेकांवर प्रेम व्यक्त करण्याच्या पद्धतीही अनेकांच्या वेगळ्या असतात. काही वेळा समोरच्याचं खूप प्रेम अतिरेकी वाटू शकतं. याच अतिरेकी प्रेमाला म्हणतात. Love Bomb Blast.

प्रेम जोडपे
एेकायला थोडं वेगळं वाटतयं ना. पण, असंच आहे. आपल्या माणसावर भरभरून प्रेम व्यक्त करण्याच्या पद्धती वेगळ्या असतात. असे भरभरून प्रेम व्यक्त करणारे काहीजण प्रेमाचा अतिरेक करतात. ते लव्ह बॉम्बर या प्रकारात मोडतात. काही भरभरून प्रेम करणारे प्रेमीजीव आपल्या जोडीदाराबाबत खूप पझेसिव्ह असतात. त्यामुळे ते डॉमिनेट करायला लागतात. सुरवातीला काही काळ याप्रकाराकडे दुर्लक्ष केलं जातं. पण नंतर मग हे प्रेम त्रासदायक वाटायला लागतं. त्याच्या तिच्या असण्याचा त्रास होतो. म्हणूनच तुमचा जोडीदार लव्ह बॉम्बर झालाय का हे डोळसपणे ओळखायला हवं. त्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवा.

नाते
सगळ्या गोष्टींची खूप घाई
अश्या व्यक्तींना प्रत्येक गोष्टीची घाई करण्याची सवय असते. त्या व्यक्तीला तुम्ही आवडू लागलात की त्याला सतत तुमच्याशी बोलायची, भेटण्याची इच्छा होते. यासाठी तुम्ही मोबाईल नंबर देणे जरी टाळलेत तरी तुमच्या मित्रामार्फत तो घेऊन तुम्हाला इरिटेट होईल असे वर्तन केले जाते. ती व्यक्ती जरी तुम्हाल चांगली वाटत असली तरी अशा छोट्या छोट्या गोष्टींमुळे तुम्हाला ओशाळं वाटू शकतं. तुमचा गोंधळ उडू शकतो. त्यामुळे समोरच्याने कुठल्याही गोष्टीची जबरदस्ती केली तर वेळीच सावध व्हा.

स्पर्श करण्यास उत्सुक
तुम्ही जोडीदाराबरोबर फिराय़ला गेल्यावर त्याने तुम्हाला अचानक नकोसा स्पर्श केला तर मनाचा गोंधळ उडणे साहजिकच आहे. समोरची व्यक्ती स्पर्शासाठी किती आतुर आहे, हे तित्याशी बोलतानही कळू शकेल. त्यामुळे डेटवर जाताना तुम्ही समोरच्याने कितपत तुम्हाला स्पर्श करावा, याबाबत ठाम रहा. कारण तुमच्याही काही मर्यादा आहेत. तुमहाला भुलवण्यासाठी ती व्यक्ती महागडं गिफ्ट पहिल्या डेटला देत असेल तर हा प्रकार लव्ह बॉम्बरमध्ये मोडू शकतो.

वागण्याचा अंदाज घ्या
तुमचा पार्टनर तुमच्याशी कसा बोलतो, इतरांसी कसा बोलतो त्याच अंदाज घ्या. तुमच्याशी तो अत्यंत चांगला बोलत असेल पण घरते किंवा इतरांशी तुसडा, अपमानास्पद बोलत असेल तर ही बाब नक्कीच काळजी करण्यासारखी आहे. अशावेळी बोलताना विविध प्रश्न विचारून त्याचा लोकंविषयी दृष्टीकोन कसा आहे यावरून वागण्याचा अंदाज घेता येऊ शकतो. काही कॉमन मित्र असतील तर त्यांचीही मदत घ्या. कारण वागण्यात दुटप्पीपणा असेल तर नात्यातही तो ब्लास्ट होऊ शकतो.
हेही वाचा: प्रायव्हेट डेटवर जाताय, कोणाबरोबर जाल ?

नाते
अशा व्यक्तीसोबत नातं टिकवावं का?
प्रचंड पझेसिव्ह, प्रत्येक गोष्टीत अतिरेक करमाऱया अशा व्यक्ती समोरच्याला कायम दाबायचा, कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे अशा लव्ह बॉम्बर सोबत राहायचं का हा विचार करा. कारण अशावेळी तुमच्या भावना दुखावल्या गेल्या असतात. तुम्ही जर तुमच्या मनाप्रमाणे वागू शकत नसाल, तर आणखी दुखावले जाण्याचा धोका असतो. अशावेळी त्या व्यक्तीसोबत असण्याचा उत्साह राहत नाही. ते नातं नकोसं वाटतं. अशावेळी ते तुटण्याचा धोका असतो. त्यामुळे अशा लव्ह बॉम्बरपासून सावध रहा .
Esakal