सध्या केरळ (Kerala) राज्यात पावसानं थैमान घातलंय, तर हिमाचल प्रदेशात (Himachal Pradesh) मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झाल्याचे चित्र आहे.
सध्या केरळ (Kerala) राज्यात पावसानं थैमान घातलंय, तर हिमाचल प्रदेशात (Himachal Pradesh) मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झाल्याचे चित्र आहे. त्यामुळं हिमाचल प्रदेशातील मनाली-लेह महामार्ग बर्फवृष्टीमुळे दोन दिवस बंद करण्यात आलाय. केरळच्या काही भागात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे विविध घटनांमध्ये 18 जणांचा मृत्यू झालाय. तसेच अनेक लोक बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, केरळच्या विविध भागातून पावसाशी संबंधित अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरही येत आहेत.तसेच हिमाचल प्रदेशात जोरदार बर्फवृष्टी होत असून मनाली-लेह महामार्ग दोन दिवस बंद केलाय. उपायुक्त लाहौल यांनी सांगितलं, की बारालाच्या माथ्यावर सुमारे दोन फूट बर्फ आहे, तो वितळण्यास कमीत-कमी 48 तास लागतील. हिमाचल प्रदेशात रविवारी पाऊस आणि बर्फवृष्टी झालीय, त्यामुळं रोहतांग खिंडीत पुन्हा एकदा बर्फाची पांढरी चादर पसरलीय.केरळातही मुसळधार पाऊस पडत असून या पावसामुळं नदीनं रौद्र रुप धारण केलंय. पावसामुळं कोट्टायम जिल्ह्यात 40 वर्षीय व्यक्ती, त्याची 75 वर्षीय आई, 35 वर्षीय पत्नी आणि 14, 12 आणि 10 वर्षांच्या तीन मुलींसह कुटुंबातील सहा सदस्यांचा कुट्टिक्कल येथे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडलीय. भूस्खलनामध्ये या कुटुंबाचे घर वाहून गेलंय. मणीमहेश शिवाय, बारालाचा, कुंजूम पास, मनाली, लाहौल-स्पीती, धौलाधार आणि चंबा या शिखरांवर मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होताना असून पर्यटकांना रोहतांग खिंडीत जाण्यास मज्जाव करण्यात आलाय.