हसरा चेहरा कोणाला आवडत नाही? चेहऱ्यावरच गोड हसू सर्व दुःख विसरण्यास मदत करू शकते. अशीच एक मुलगी आहे, जिच्या गोड हास्याने अख्ख्या जगाला वेड लावलंय. जेव्हा तिचा हसरा चेहरा तुम्ही पाहाल तेव्हा तुमच्या चेहऱ्यावरही एक स्मित हास्य येईल. तिच्या या गोड हास्यावर सार जगं फिदा झाले आहे. कोणालाही असूया वाटावी अशी ही मुलगी आहे तरी कोण ?
जादुई हास्याची देणगी लाभलेल्या गोंडस मुलीचे नाव अनाहिता हाशमाजादेह असे आहे. १० जानेवारी २०१६ रोजी जन्मलेली अनाहिता इराण देशातील इसफहान शहराची रहिवासी आहे. २०१९ मध्ये, लडाखचे खासदार जम्यांग त्सेरिंग यांनी ट्विटरवर अनाहिता हाशमझादेहची एक व्हिडिओ क्लिप पोस्ट केली. या व्हिडिओमध्ये अनाहिता गोड हास्य दिसत होते.

जामयांग त्सेरिंगने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले होते, ‘आज मी इंटरनेटवर पाहिलेली ही सर्वात सुंदर गोष्ट आहे’. अनाहिताचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि संपूर्ण जग या चिमुकलीच्या सुंदर स्मितहास्यावर फिदा झाले. २०१९ मध्ये हा व्हिडिओ व्हायरल झाला होता, तेव्हा अनाहिता ३ वर्षांची होती. तिच्या गोंडस हास्यामुळे, अनाहिताला जगातील ‘सर्वात गोड हसरी मुलगी’ म्हटले गेले आहे.

जर तुम्ही इंटरनेटवर ‘वर्ल्ड क्यूटेस्ट बेबी’ सर्च केले तर फक्त अनाहिताचे नाव दिसेल. सध्या अनाहित ही बेबी मॉडेल आहे. इन्स्टाग्रामवर तिचे बरेच फोटो आणि व्हिडिओ आहेत जे व्यावसायिक छायाचित्रकारांनी क्लिक केले आहेत. अनाहिता हाशमाजादेह अजूनही लहान आहे, म्हणून तिची आई तिचे इन्स्टाग्राम अकाउंट हाताळते आणि त्यावर अनाहिताचे गोंडस फोटो पोस्ट करत राहते.
Esakal