भारतीय संघाचा आजपासून टी२० विश्वचषक २०२१चा प्रवास सुरू होत आहे. आज इंग्लंडविरूद्ध आणि २० तारखेला ऑस्ट्रेलियाविरूद्ध भारत सराव सामने खेळणार आहे. त्यानंतर २४ तारखेला भारत विरूद्ध पाकिस्तान या सामन्यात टीम इंडिया खऱ्या प्रवासाला सुरूवात होईल. या स्पर्धेनंतर भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि त्यांचा काही सपोर्ट स्टाफ आपल्या पदावरून पायउतार होणार आहेत. रवी शास्त्रींच्या जागी माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड याला दोन वर्षांसाठी करारबद्ध करण्याचा विचार जवळपास निश्चित झाला आहे. पण द्रविड सध्या जे पद भूषवत आहे त्या पदासाठी BCCI नवा उमेदवार शोधत असून त्यास व्हीव्हीएस लक्ष्मणने नकार दिला आहे.

हेही वाचा: T20 WC: ‘मेंटॉर’ धोनीचा पहिला फोटो व्हायरल; लाईक्सचा वर्षाव!

राहुल द्रविड सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या मुख्य प्रशिक्षकपदी आहे. मात्र, त्याला टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची ऑफर आल्याने ही जागा रिक्त होत आहे. अशा परिस्थितीत BCCI कडून या पदासाठी भारताचा दिग्गज कसोटीपटू व्हीव्हीएस लक्ष्मण याला विचारण्यात आले होते. पण त्याने या पदासाठी नकार दिला असल्याचे सांगण्यात येत आहे. द्रविड टी२० विश्वचषक स्पर्धेनंतर भारताच्या मुख्य प्रशिक्षक पदावर रूजू होणार आहे. त्यामुळे BCCI ला महिन्याभराच्या कालावधीत ही रिक्त जागा भरायची आहे. लक्ष्मण हा गेल्या काही वर्षांपासून सनरायजर्स हैदराबाद या संघाचा मार्गदर्शक म्हणून काम पाहत आहे. त्यामुळे युवा खेळाडूंना मार्गदर्शन करण्यासाठी लक्ष्मण याच या जागेचा उत्तम पर्याय असल्याचे BCCI चे मत आहे. पण लक्ष्मणने मात्र यास नकार दिला असल्याने आता BCCI पुढे नवा पेच निर्माण झाला आहे.

हेही वाचा: T20 World Cup: टीम इंडियाची आज इंग्लंडविरूद्ध ‘सराव’ परीक्षा

राहुल द्रविड

राहुल द्रविड

दरम्यान, टी२० विश्वचषक स्पर्धा ही रवी शास्त्री यांची मुख्य प्रशिक्षक म्हणून शेवटची स्पर्धा आहे. या स्पर्धेनंतर शास्त्री आणि इतर सपोर्ट स्टाफ आपल्या पदावरून दूर होणार आहेत. याशिवाय, भारताचा कर्णधार विराट कोहली हा देखील आपल्या कर्णधारपदाचा राजीनामा देणार आहे. त्याने आधीच याबद्दची घोषणा केली आहे. अशा परिस्थितीत नव्या ढंगात पुन्हा टीम इंडियाची मोर्चेबांधणी करण्याचे आव्हान संघ व्यवस्थापनापुढे असणार आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here