वाढतं पोट हा चिंतेची बाब बनली आहे. पोटाचा घेर कमी करण्यासाठी लोक वेगवेगळे प्रयत्न करतात. त्यात चालणे, जीमला जाणे, सोनाबेल्ट लावणे, दिक्षित डाएट-दिवेकर डाएट अशा प्रकारच्या प्रयत्नांचा समावेश असतो. मात्र,त्या जोडीला आहारात काही घरगुती पदार्थांचा वापर वाढविल्यास पोटाचा घेर कमी होण्यास मदत होईल.

हेही वाचा: वजन कमी करायचे म्हणजे नेमक काय करायचं; हे आहेत सहज सोपे उपाय

दही खाल्याने शरीराला पोषण मिळेल आणि लठ्ठपणा देखील वाढणार नाही.

दही खाल्याने शरीराला पोषण मिळेल आणि लठ्ठपणा देखील वाढणार नाही.

दही- दही पौष्टीक असल्याने ते खाल्ल्याने पोटाला आराम मिळतो. शरीरातील समस्या दूर होतात. दही भात खाल्ल्याने वजन कमी होऊन पोटाचा घेर कमी होण्यासही मदत होईल.

काकडी- अननस- काकडी आरोग्यासाठी अतिशय चांगली. काकडी खाल्ल्याने तुमचे पोट साफ होण्यास मदत होते. काकडी, टरबूज, द्राक्षे, अननस ही फळे खावून तुम्ही सुटलेले पोट कमी करू शकता. अननसात पॉटेशियम असते. ते तुमच्या पोटातील पाणी संतुलित करते. परिणामी पोट कमी होण्यास मदत होते.

आलं- पचनक्रिया सुधारण्यासाठी आलं अतिशय उत्तम आहे. आलं आतड्यांना साफ करत असल्याने ते खाल्ल्याने नक्कीच परिणाम जाणवतो.

केळी- केळ्यातही भरपूर प्रमाणात पॉटेशियम असते. पूर्ण पिकलेली केळी योग्य प्रमाणात खाल्ल्याने तुमचे सुटलेले पोट आटोक्यात राहू शकते.

ओट्स- फायबरचे प्रमाण ओट्समध्ये जास्त असते. हे खावून बद्धकोष्ठता टाळता येते. त्यामुळे पोट सुटत नाही. त्यामुळे ओट्स आठवड्यातून एकदा तरी खावेत.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here