करवा चौथ 2021 हा सण येण्यास फक्त काही दिवस शिल्लक आहेत. यावेळी करवा चौथ 24 ऑक्टोबर 2021 रोजी साजरा केला जाणार आहे. करवा चौथच्या दिवशी महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत ठेवतात आणि स्वत: खूप सजतात. अशा परिस्थितीत जर तुम्हाला देखील करवा चौथ दिवशी ग्लोइंग स्कीन हवी असेल, तर आम्ही तुम्हाला एका फेस पॅक बद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे फक्त 15 मिनिटांत चेहरा चमकू शकेल. चला तर मग 15 मिनिटात चमकदार त्वचा कशी मिळवू शकतो ते जाणून घेऊया.

गुलाब पावडरसह फेस पॅक बनवा : हे बनवण्यासाठी कच्च्या दुधात गुलाबाची पूड मिसळून पेस्ट बनवा. त्यात कोरफड जेल मिसळा. त्यानंतर त्यात मध घाला. हे स्कीन मऊ आणि निरोगी बनवते. नंतर त्यात एक चमचा गुलाब पाणी घाला. हा फेस पॅक 15 ते 20 मिनिटांसाठी चेहऱ्यावर लावा. करवा चौथला तुमची स्कीन ग्लोइंग दिसेल.
मध: मधामध्ये शरीराला डिटॉक्स करण्याची क्षमता असते, ते रक्त शुद्ध करते. त्वचेवर मध लावल्याने जळजळ कमी होते, हानिकारक बॅक्टेरिया देखील नष्ट होतात. मध त्वचेमध्ये तयार झालेले काळे डाग देखील बरे करते.
कोरफड जेल : कोरफड जेल चेहरा स्वच्छ करण्याचे काम करते, तसेच सावळेपणा कमी करते. कोरफडमध्ये अँटी-ऑक्सिडंट्सचे प्रमाण जास्त असते, ते लावल्याने चेहऱ्यावरील चमक अबाधित राहते.
कच्चे दूध: कच्चे दूध त्वचेला चमकदार बनवण्यास मदत करते आणि त्यात असलेले लैक्टिक अॅसिड त्वचेतील बॅक्टेरिया काढून टाकते आणि ते खोलवर साफ करते.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here