नागपूर : पेहरावावर मॅच होणारी पादत्राणे आवर्जून खरेदी केली जात असली तरी ही घालून चालताना पहिले काही दिवस खूप त्रास होतो. नवी पादत्राणे चावतात, पायांना जखमाही होतात. पुरुषांच्या तुलनेत महिलांना शू बाइटचा जास्त त्रास सहन करावा लागतो. परंतु, काही उपायांनी या जखमा आणि वेदना कमी करता येतात.

नव्या पादत्राणांमुळे झालेल्या जखमा दूर करण्यासाठी खोबरेल तेलाचा वापर उपयुक्त ठरतो. नारळाची पाने जाळून खोबरेल तेल मिसळून या जखमांवर लावा. नंतरच पादत्राणे घाला.
चप्पल चावल्याने पडणारे डाग मधामुळे दूर होतात
मध आणि तिळाचे तेल जखमेवर लावल्यास व्रण नाहीसे होतात
नैसर्गिक स्क्रब म्हणून वापरण्यासाठी चमचाभर तांदळाच्या पिठाची पेस्ट तयार करा. जखमेवर लावून पंधरा मिनिटांनी कोमट पाण्याने धुऊन टाका
जखमेवर कोरफडीचा रस लावता येईल
नव्या पादत्राणांच्या आतल्या बाजूला पेट्रोलियम जेली लावा. पादत्राणे रात्रभर तशीच ठेवा. यामुळे ती मऊ पडतील आणि जखम होण्याची शक्यता कमी होईल.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here