ऑनलाईन डेटिंग करणे अवघड असते. अशा वेळी जेव्हा तुम्ही ऑनलाईन प्रोफाईल सेट करता तेव्हा तुम्ही सर्व काही बेस्ट असावे यासाठी प्रयत्न करता. जेणेकरून कोणीही सहज तुमच्यावर इंप्रेस होऊ शकेल. पण तुम्हाला एक गोष्ट कायम लक्षात ठेवायला हवी की प्रोफाईलच्या बायोमध्ये पुर्णपणे माहिती द्यायला हवी. जर असे तुम्ही करत असाल तर तुम्हाला जास्त योग्य मॅच भेटेल. यासोबतच हे देखील गरजेचे आहे की तुम्ही योग्या फोटो निवडू शकता. त्यामुळे तुम्ही डेटिंग प्रोफाईल निवडताना काही गोष्टी लक्षात ठेवायला. आम्ही तुम्हाला प्रोफाईल फोटो कसा सेट करायाचा याबाबत टिप्स देणार आहोत.

टिप 1
असा फोटो निवडू नका ज्यामध्ये तुमचा चेहरा क्लिअर दिसत नाही किंवा दिसत नाही. असा फोटो असेल समोरच्याला तुमचा फोटोच दिसणार नाही. अशा फोटो निवडा ज्यामध्ये तुमचा चेहरा व्यवस्थित दिसत आहे.

टिप 2
कित्येकदा लोक डेटिंग अॅपवर ग्रुप फोटो लावतात, त्यामुळे समोरच्या व्यक्तीला कन्फ्युजन होऊ शकते कि नक्की प्रोफाईल कोणाचे आहे. त्यामुळे लक्षात ठेवा फोटोमध्ये फक्त तुम्ही दिसाल. ग्रुप फोटो वापरू नका.

टिप 3
ऑनलाईन डेटिंग अॅपसाठी फोटो निवडत असला तर असा फोटो निवडा जो तुम्हाला डिस्क्राईब करेल, जर तुम्हाला कॅपिंग आवडत असे तर कँपिंग करताना काढलेला चांगला फोटो वापरा किंवा तुम्हाला पुस्तक वाचायला आवडत असेल तर कोणत्यातरी लायब्ररीमध्ये क्लिक केलेला छान फोटो वापरू शकता.

टिप 4
एक असा फोटो वापरा ज्यामध्ये तुम्ही कॉन्फिडेंट दिसाल. कित्येकदा लोक ज्या कपड्यांमध्ये कॉन्फिडेंट नसतात तरी त्याच कपड्यांमधील फोटो प्रोफाईलला लावतात.
Esakal