बालेवाडी – कोरोना महामारीमुळे सगळ्या जगाचे डोळे खाडकन उघडले आहेत. अशा महामारीचा सामना करण्यात भारत कधी नव्हे तो आज नरेंद्र मोदींच्या सक्षम नेतृत्वामुळे स्वावलंबी झाला आहे. आजवर कोणत्याही महामारीवर पाश्चात्य देशांतून लसी मागवाव्या लागायच्या. आज कोरोनावर भारतातच लस निर्मीती झाली असून ती भारतातील मुख्य शहरांसह देशातील कानाकोप-यात जलद आणि प्रभावी पद्धतीने पोहचवली जात आहे. दूर्गम भागात ड्रोनच्या मदतीसह आदी तंत्रज्ञान आणि दळण-वळण साधनांचा उपयोग करुन घेऊन आपण लवकरच कोरोना लसीकरणाचा शंभर कोटींचा टप्पा लवकरच गाठू असा विश्वास केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी व्यक्त केला.

पुणे शहरात विविध 19 ठिकाणांसह बाणेर येथे 20 व्या सोनोक्लिनिक डायग्नोस्टिक सेंटरच्या लोकार्पण समारंभाप्रसंगी पवार बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर डॉ. स्नेहल बडजाते, वैभव बेदरकर, सी. पी. एस. सी. चे अध्यक्ष डॉक्टर गिरीश मैंदरकर, नगरसेवक बाबुराव चांदेरे, नगरसेवक अमोल बालवडकर, नगरसेविका ज्योती कळमकर, नगरसेविका स्वप्नाली सायकर, बी. एम. ए. चे अध्यक्ष डॉ. राजेश देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.

हेही वाचा: पुण्याच्या अर्णवीचा स्केटिंग मध्ये विश्वविक्रम

सोनोक्लिनिक डायग्नोस्टिक सेंटरच्या लोकार्पण समारंभानिमित्त आरोग्य चाचण्या करुन घेण्याच्या दृष्टीने नागरीकांचा कल वाढावा म्हणुन 500 नागरिकांना आरोग्य कार्डचे पवार यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. तसेच, कोरोना काळात स्वतःच्या आरोग्याची पर्वा न करता जीवाची बाजी लावून ज्या कोरोना योद्ध्यांनी कर्तव्य बजावले. अशा योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच, सामाजिक भावनेतून गरजू अपंग व्यक्तिस व्हिल चेअरचे वाटप करण्यात आले. कोरोना काळात सर्वांना ऑक्सिजनचे महत्त्व कळाले. नैसर्गिकदृष्ट्रया उपलब्ध असलेल्या ऑक्सिजनचे विषयी जनसामान्यांमध्ये जागृतकता वाढावी म्हणुन यावेळी पवार यांच्या हस्ते वृक्षारोपण देखील करण्यात आले.

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार म्हणाल्या, अनेकदा नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने आपण आपल्या आरोग्याची हेळसांड करतो. जोवर शरीर काही तक्रार करीत नाही तोवर आपण आरोग्याबाबत दक्ष राहत नाही. पंरतू वेळोवेळी वयाच्या विविध टप्प्यांवर आरोग्याशी संबंधीत विविध चाचण्या करुन घेणे आवश्यक आहे. एखाद्या आजाराचे वेळीच निदान झाल्यास त्या आजाराचे व्याधीत रूपांतर होण्या आधी आपण त्यावर उपाय योजना करु शकतो. डॉ. स्नेहल बडजाते यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

तसेच डॉ. पवार यांनी बालेवाडी येथील लहू बालवडकर यांच्या जनसंपर्क कार्यालय येथे सुरु असलेल्या लसीकरण केंद्राला ही भेट दिली.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here