मुंबई – ब़ॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आणि बबली गर्ल म्हणजे जुही चावला हिने ‘सल्तनत’ या चित्रपटातून पदार्पण केलं होतं. पण तिला कयामत से कयामत या चित्रपटातून जास्त प्रसिध्दी मिळाली. या चित्रपटात जुही सोबत अमिर खान हा मुख्य भुमिकेत होता. या चित्रपटातनंतर या दोघांच्या जोडीला लोकांनी खुप पसंती मिळाली. पण चित्रपट रिलीज होण्यापूर्वी टॅक्सी ड्रायवर चित्रपटाचे पोस्टर त्यांच्या टॅक्सीवर लावण्यासाठी नकार दिला होता. एवढेच नाही तर , जेव्हा जुही आणि अमिरने त्यांच्याकडे विनंती केली, तेव्हा त्यांना तेथून जाण्यास सांगितले होते.
नुकतीच जुही चावला ‘द कपिल शर्मा शो’ या कार्यक्रमात आली होती. तेव्हा तिने या कार्यक्रमात खुद्द जुही चावलाने हा किस्सा आठवताना म्हणाली, “मला अजुनही आठवतयं, आमचा चित्रपट रिलीज होणार होता, आणि तेव्हा आम्हाला कोणी ओळखत नव्हतं,त्यावेळी टॅक्सीवर चित्रपटाचे पोस्टर लावणं अगदीच साहजीक होतं. आमच्या बिल्डिंगच्या खाली टॅक्सीची लाइन असायची.”

पुढे ती म्हणाली, ” अशा परिस्थितीत, आम्ही ते पोस्टर घेऊन त्या टॅक्सी ड्रायवरकडे गेलो आणि त्यांना टॅक्सीवर पोस्टर्स लावण्याची विनंती करण्यास सुरुवात केली. त्याने विचारले, ‘हा मुलगा कोण आहे?’ मी सांगितले की नायक आमिर खान आहे. मग त्याने माझ्या फोटोकडे बोट दाखवले आणि म्हणाला हा कोण आहे? मी त्यांना सांगितले की मी आहे. तेव्हा त्यांनी आमची पोस्टर्स लावण्यास स्पष्ट नकार दिला. पण त्यापैकी काही असेही होते जे खूप प्रेमाने बोलले आणि आमची पोस्टर्सही लावली. ” शोमध्ये जुही चावलाने सांगितले की त्या काळात ती आणि आमिर खान थिएटरच्या बाहेर उभे राहून लोकांना चित्रपट आवडला की नाही हे पाहण्याचा प्रयत्न करायचो. ‘कयामत से कयामत तक’च्या नंतरही जुही आणि अमिरने एकत्र अनेक चित्रपटात काम केले आहे. तसेच जुहीने अनेक सुपरहिट सिनेमे केले आहेत.
हेही वाचा: पब्लिसिटी स्टंट केला की नाही हे ठरवणारे तुम्ही कोण? जुही संतापली
हेही वाचा: दिल्ली हायकोर्टाकडून अभिनेत्री जुही चावलाला 20 लाखांचा दंड
Esakal