T20 World Cup 2021: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील राजकीय संबंध अतिशय तणावपूर्ण आहेत. त्यामुळेच गेल्या कित्येक वर्षात भारत आणि पाकिस्तान यांच्यात ICC च्या स्पर्धा वगळता इतर वेळेस क्रिकेट सामने झालेले नाहीत. कोरोनाकाळात पाकिस्तानच्या काही माजी खेळाडूंनी भारताशी क्रिकेट सामने पुन्हा सुरू खेळले जायला हवेत असं मत मांडलं. भारतीय क्रिकेटपटू आणि क्रिकेट फॅन्सने या ऑफरला फारशी किंमत दिली नाही. पण आता मात्र पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे नवनिर्वाचित अध्यक्ष रमीझ राजा यांनी भारतीय क्रिकेटबद्दल महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.
हेही वाचा: T20 WC: ‘मेंटॉर’ धोनीचा पहिला फोटो व्हायरल; लाईक्सचा वर्षाव!

ind vs pak
हेही वाचा: T20 World Cup: मराठमोळ्या शार्दूलची ‘टीम इंडिया’मध्ये एन्ट्री!!
“आशियाई क्रिकेट संघटनेने सोमवारी स्पष्ट केले आहे की २०२३ सप्टेंबरला पाकिस्तानात होणारा आशिय चषक ५० षटकांच्या वन डे सामन्यांचा असेल. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात एकदिवसीय विश्वचषक रंगणार आहे. पाकिस्तान नक्कीच आशिया चषकाचे यशस्वी आयोजन करण्याचे प्रयोजन करेल. ती स्पर्धा उत्तम रितीने आयोजित केली जाईल याची मला खात्री आहे. मी BCCI अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह यांच्याशी संवाद साधला. मी त्यांना विनंती केली की राजकारण बाजूला ठेवून खेळ जसा आहे तसा सुरू ठेवायला हवा. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेटमधले संबंध तरी नक्कीच सुधारले जायला हवेत. भारत-पाक क्रिकेटला पूर्ववत आणण्यासाठी खूप प्रयत्न करावा लागतील यात वादच नाही. पण आमच्यात चांगली चर्चा झाल्याने भविष्यात चांगल्या गोष्टी घडू शकतील”, असा विश्वास रमीझ राजाने व्यक्त केला.
Esakal