‘ढाई किलो का हाथ..’ या एका संवादामुळे अभिनेता सनी देओलने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. सनी देओलने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. पडद्यावर ‘अँग्री मॅन’ वाटणाऱ्या सनीने एका चित्रपटाच्या शूटिंगदम्यान चक्क अभिनेते अनिल कपूर यांचा गळा आवळला होता.

‘जोशिले’ या चित्रपटात सनी देओल आणि अनिल कपूर यांनी पहिल्यांदा एकत्र काम केलं. अभिनेत्री श्रीदेवी यांचीही यात महत्त्वपूर्ण भूमिका होती.
या चित्रपटाच्या श्रेयनामावलीत सनी देओलचं नाव अनिल कपूर यांच्यानंतर दाखवलं गेलं. म्हणून तो नाराज झाला होता.
त्यानंतर त्याच वर्षी ‘राम अवतार’ या चित्रपटात पुन्हा एकदा सनी आणि अनिल एकत्र आले. सनी देओलने या चित्रपटातील एका अॅक्शन सीनदरम्यान अनिल कपूर यांचा गळा खरोखरच आवळला होता.
शूटिंग करताना जुन्या गोष्टी आठवल्याने संतप्त झालेल्या सनीने अनिल कपूर यांचा गळा आवळला होता. दिग्दर्शक कट बोलल्यानंतरही त्याने अनिल कपूर यांचा गळा सोडला नव्हता.
अखेर टीमला सनी देओलजवळ जाऊन त्याला थांबवावं लागलं होतं. या चित्रपटानंतर अनिल कपूर आणि सनी देओल पुन्हा कधी एकमेकांशी नीट बोलले नाहीत.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here