दिवाळी 15 दिवसांवर आली आहे. गेल्या दिड वर्षांत मोठी सुट्टी न घेतल्याने तुम्ही यावेळी अशी सुट्टी घेऊन फिरायला कुठे जायचं हा प्लॅन करताय का? परदेशात जाण्याचीही योजना आखताय का? असे असेल तर तुमच्यसाठी आनंदाची बातमी आहे. कारण काही पाश्चिमात्य देशांनी त्यांचे कोरोनाविषयक निर्बंध शिथिल करत आंतरराष्ट्रीय प्रवासाला परवानगी दिली आहे. त्यामुळे तुम्ही आता परदेशात बिनधास्त सहलीला जाऊ शकता.

प्रवास

संपूर्ण जगालाच 2019 च्या अखेरनंतर कोविड 19चा सामना करावा लागला. त्यामुळे अनेकांनी त्यांच्या राज्यात येण्याचे निर्बंध कडक केले होते. अमेरिका. युके यासारख्या अनेक देशांनी आंतरराष्ट्रीय प्रवासाला बंदी घातली होती. पण आता अनेक देशांमधील लसीकरण पूर्ण झाल्याने या देशांनी आंतरराष्ट्रीय प्रवासाला परवानगी दिल्याने पर्यटकांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे तुम्ही फॅमिलासोबत या काही देशात दिवाळीत फिरायला जायचा प्लॅन नक्की करू शकता.

संयुक्त राज्य

युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका – ज्यांनी लसींचे दोन डोस घेतले आहेत अशांसाठी अमेरिकेने 8 नोव्हेंबरपासून आंतरराष्ट्रीय प्रवास करण्यास मान्यता दिली आहे. मात्र हा प्रवास करताना आरटी-पीसीआर चाचणी निगेटिव्ह येणे आणि लसीकरण पूर्ण झाल्याचा पूरावा देणे आवश्यक आहे. लस न घेतलेल्या व्यक्तींसाठी मार्गदर्शक तत्वे लवकरच जाहीर होतील.

यूके

यूके- युकेमध्ये प्रवास करताना ज्या भारतीयांचे लसीकरण पूर्ण झाले आहे त्यांनी लसीकरण झाल्याचा पुरावा दाखवणे आवश्यक आहे. त्यानंतर त्यांना quarantine होण्याची गरज नसेल. मात्र तेथे पोहोचल्यानंतर दुसऱ्या दिवशी आरटी-पीसीआर चाचणी करणे आवश्यक आहे.

थायलंड- ज्या देशातील नागरिकांचे पूर्णपणे लसीकरण झाले आहे अशा दहा देशांतील नागरिकांना 1 नोव्हेंबरपासून थायलंडध्ये प्रवेश दिला जाईल. मात्र त्यासाठी आरटी-पीसीआर चाचणी निगेटिव्ह येणे गरजेचे आहे. त्यांना quarantine होण्याची गरज नसेल. पण भारतीयांना मात्र सात दिवस quarantine रहावे लागणार आहे. थायलंडमध्ये पोहोचल्यावर एक आणि सहा ते सात दिवसांनंतर दुसरी अशा दोन आरटी-पीसीआर चाचण्या करणे भारतीयांसाठी बंधनकारक आहे. यात लसीचे प्रमाणपत्र सोबत बाळगणे आवश्यक आहे.

बहराइन

बाह्य – विशिष्ट राष्ट्रांमधून लसीकरण केलेल्या प्रवाशांना बाहरीनमध्ये येण्याची परवानगी आहे. येथे प्रवेश केल्यानंतर, आगमनानंतर पाचव्या आणि दहाव्या दिवशी पूर्णपणे लसीकरण झालेल्या भारतीयांसाठी (आगमन व्हिसासाठी पात्र) आरटी-पीसीआर चाचण्या आवश्यक आहेत.

EGYPT

इजिप्त – येथे येण्यापूर्वी 72 तास आधी आरटी-पीसीआर चाचणी करणे अनिवार्य आहे. 6 वर्षाखालील मुलांना यापासून वगळले आहे.

चिली

चिली- ज्या नागरिकांचे पूर्णपणे लसीकरण झाले आहे त्याचे प्रमाणपत्र आणि आरटी-पीसीआरचा निगेटिव्ह रिपोर्ट दाखवणे चिलीने बंधनकारक केले आहे. चिली पब्लिक हेल्थ इन्स्टिट्यूट, WHO, युनायटेड स्टेट्स फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशन , युरोपियन मेडिसिन एजन्सीने तुमच्या लसीला मान्यता देणे आवश्यक आहे.

श्रीलंका

श्रीलंका- तुमचे लसीकरण झाले नसेल तर श्रीलंकन सरकारने मंजूर केलेल्या हॉटेल्समध्ये 14 दिवस quarantine राहणे बंधनकारक आहे. तसेच आल्यावर आणि quarantine काळ संपल्यावर आरटी-पीसीआर चाचणी करणे गरजेचे आहे. ज्या भारतीयांचे पूर्णपणे लसीकरण झाले आहे त्यांनीही श्रीलंकेत येण्याच्या 72 तास आधी आरटी-पीसीआर चाचणी करणे आवश्यक असून सोबत लसीकरण प्रमाणपत्र दाखवावे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here