IPL 2022 साठी मेगा लिलाव होणार आहे. या लिलावाबद्दलचे नियम अद्याप स्पष्ट झालेले नाहीत. मात्र प्रत्येक संघांना रिटेन्शन कार्ड वापरण्याची संधी मिळाली तर चेन्नईचा संघ पहिलं रिटेन्शन कार्ड महेंद्रसिंग धोनीसाठी वापरेल आणि त्याला संघात कायम राखेल असं CSK व्यवस्थापनाकडून सांगण्यात आलं होतं. त्यातच आता CSK चे संघमालक एन श्रीनिवासन यांनी एक महत्त्वाचं विधान केलं आहे. धोनीशिवाय चेन्नईचा संघ आणि CSK च्या संघाशिवाय धोनी अपूर्ण आहे, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे.
हेही वाचा: T20 WC: ‘मेंटॉर’ धोनीचा पहिला फोटो व्हायरल; लाईक्सचा वर्षाव!
“महेंद्रसिंग धोनी आणि चेन्नई सुपर किंग्स हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. चेन्नई, तामिळनाडू आणि धोनी यांचं एक खास नात तयार झालं आहे. त्यामुळे एक बाब लक्षात ठेवा की CSK शिवाय धोनी आणि धोनीशिवाय CSK याला काहीच अर्थ नाही. हे दोघे कायम एकमेकांशिवाय अपुरे आहेत. आणि हे दोघे एकत्र असतील तर दोघांनाही पूर्णत्व येतं”, असं स्पष्ट विधान एन श्रीनिवासन यांनी केलं.

एन श्रीनिवासन
हेही वाचा: Video : T20 World Cup स्पर्धेच्या पहिल्या दिवशी हॅटट्रिक हुकली!
दरम्यान, महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली CSK ने यंदाच्या IPL चे विजेतेपद मिळवलं. KKR शी फायनलमध्ये दोन हात करताना चेन्नईच्या संघाने खूप चांगली कामगिरी केली. २०१०, २०११, २०१८ या तीन विजेतेपदानंतर २०२१ मध्ये त्यांनी चेन्नईला चौथे विजेतेपद मिळवून दिले. तसेच, सध्या धोनी टीम इंडियाचा मार्गदर्शक म्हणून संघासोबत आहे. टी२० विश्वचषक स्पर्धेसाठी त्याला खास नियुक्त करण्यात आलं आहे.
Esakal