तुम्हाला झोप अतिशय प्रिय आहे का? रोजच्या कामामुळे, धावपळीमुळे पुरेशी झोप मिळत नाहीये का?असं असेल तर तुम्हाला भरपूर झोपण्याची एक संधी चालून आलीय. त्यासाठी पगारही मिळणार आहे. थोडा थोडका नव्हे तर चक्क 25 लाख. ब्रिटनमधील एका कंपनीने असे झोपण्याचे आणि आराम करण्याचे पैसे दिले जातात. घरात अंथरूणावर पडून झोपणं आणि टिव्ही पाहणं एवढचं काम तुम्हाला करायचं आहे. मग आहात तयार.
‘क्राफ्टेड बेड्स’ (Crafted Beds) ही कंपनी अशी नोकरी देत असल्याचे द सन ने म्हटले आहे. ही कंपनी तुमच्या घरी गादी पाठवून झोपायची सोय करणार आहे. दररोज 6 ते सात सात अंथरुणात लोळणे ज्यांना आवडेल त्यांना ही कंपनी नोकरी देईल.
हेही वाचा: मैदा-तांदळाच्या पिठातील भेसळ कशी ओळखाल? FSSAI ने सांगितल्या टिप्स

स्लीप एपनिया
क्राफ्टेड बेड्सद्वारे मॅट्रेस टेस्टर या पदासाठी काम करावे लागणार आहे. कंपवी नोकरी करणाऱयाला 24,000 पौंड म्हणजेच भारतीय चलनात सुमारे 25 लाख रुपये वार्षिक वेतन देईल. कंपनीच्या बेडवर झोपून त्याचा रिव्ह्यू देणे असे काम प्रमुख्याने असेल. त्यात तयार केलेल्या गाद्या कशा वाटतात. आरामदायक आहेत का? त्यात काही सुधारणा करण्याची गरज आहे का हे कंपनीला सांगावं लागणार आहेय आणि त्यासाठी तुम्हाला आठवड्यातले 37.5 तास गादीवर राहवं लागणार आहे. कंपनीने इच्छुकांचे अर्ज मागवले आहेत.
सध्या हा जॉब ब्रिटनमधल्या नागरिकांनाच करता येईल, त्यांना ऑफिसमध्ये यायची गरज नसून कंपनीच त्यांच्या घरी गाद्या पाठवणार आहे, असे क्राफ्टेड बेड्सचे मार्केटिंग मॅनेजर ब्रायन डिलन यांनी सांगितले. नोकरी करणाऱ्याला गादीबाबतचा रिव्ह्यू दर आठवड्याला कंपनीला पाठवाचा आहे. भारतातही असा जॉब सुरू झाला तर किती अर्ज येतील हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
Esakal