चीनने भारतीय हद्दीत घुसखोरी केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून चीनसोबत सीमेवर तणावाचं वातावरण आहे. मात्र, जर संघर्ष झालाच तर भारतीय सैन्याला चीनचा सामना करण्यासाठी आता नवी हत्यारे असावीत, म्हणून नोएडामधील अपेस्टरॉन प्रायवेट लिमिटेडने पारंपारिक हत्यारे तयार केली आहेत. यामध्ये लाठी, दांडा, काट्यांची तार ही आणि अशी अनेक शस्त्रास्त्रे उपलब्ध आहेत. सॅपर पंच – सॅपर पंच म्हणजे इलेक्ट्रीक ग्लोव्ह्ज. शत्रूला जोरदार ठोसा लगावण्यासाठी याचा उपयोग होतो. जवळपास ८ तासांसाठी हा चार्ज राहतो. हा वॉटरप्रूफ असून शून्य ते तीस तापमानामध्ये काम करु शकतो. त्रिशूल – त्रिशूल भगवान शंकरांचं हत्यार आहे. त्रिशूल खूपच खतरनाक हत्यार असून त्याची टोके आरपार शरिराला भेदू शकतात. दंड – दंड म्हणजे वीजेने चालणारा दांडा. हा ८ तासांपर्यंत चार्ज राहू शकतो. हा वॉटरप्रूफ देखील आहे. भद्र – भद्र ही एक खासप्रकारची ढाल आहे. दगडांच्या हल्ल्यात ही वाचवू शकते. यातून वाहणारा करंट शत्रूला नेस्तनाबूत करु शकतो. वज्र – वज्र म्हणजे एक धातूची लाठी आहे. यामध्ये शत्रूला करंटचा जोरदार झटका देण्याचं सामर्थ्य आहे. समोरील शत्रूला काही काळासाठी बेशुद्ध करु शकतं.