नागपूर : स्कुबा डायव्हिंग हा धाडसी खेळ आहे. यात समुद्राच्या तळाशी जाऊन सागरी जीवन न्याहाळता येते. हा एक भन्नाट अनुभव असतो. भारतातली काही ठिकाण स्कुबा डायव्हिंगसाठी प्रसिद्ध आहेत. अशाच काही ठिकाणांवर नजर टाकू या…

अंदमान निकोबार बेटांवर स्कुबा डायव्हिंगचा आनंद लुटता येतो. इथल्या निळ्याशार समुद्रातली सृष्टी बघणे हा अनोखा अनुभव ठरतो. समुद्राच्या तळाशी गेल्यानंतर मासे अगदी आपल्या जवळून जातात.

लक्षद्विपलाही अनेक जण स्कुबा डायव्हिंगसाठी येतात. परदेशी पाहुण्यांनाही इथे स्कुबा डायव्हिंग करायचे असते. ऑक्टोबर ते एप्रिल या काळात लक्षद्वीपला जाता येईल. या दिवसांत इथले वातावरण आल्हाददायक असते आणि स्कुबा डायव्हिंगचा आनंद लुटता येतो.

कर्नाटकमधले तरानी बेट स्कुबा डायव्हिंगसाठी खूप प्रसिद्ध आहे. तरानी बेटांना पजन आयलंडही म्हटले जाते. हे ठिकाण वॉटरस्पोर्टससाठी प्रसिद्ध आहे.

गोव्यातल्या ग्रँड आयलंडवरही स्कुबा डायव्हिंगचा आनंद लुटता येतो. इथल्या स्वच्छ पाण्यात समुद्री जीवनाचे छान दर्शन होते.
Esakal