सध्या ऑक्टोबर हिटमुळे अनेकजण त्रस्त आहेत. प्रचंड उकडत आहे. वातावरणातील सततच्या बदलामुळे लोकांच्या पोटावरही परिणाम झाला आहे. तर काहीजणांच्या पायाच्या तळव्याची आग होतेय. त्यामुळे त्यांचा वैताग आणखी वाढला आहे. मात्र काही घरगुती उपयांनी ही आग, जळजळ तुम्ही कमी करू शकता. असे केल्याने तुमच्या पायांना आराम मिळेल. असे आहेत घरगुती उपाय.

हळद लावणे उत्तमच – हळद लावूनही जळजळ कमी करता येऊ शकते. एक चमचा हळदीची पेस्ट करून ती तळव्यावर पाच मिनिटे लावून ठेवायची. नंतर स्वच्छ धुवायची. हळदीमध्ये असलेल्या दाहक विरोघी गुणधर्मामुळे जळजळीपासून आराम मिळेल.

पायावर मेहंदी लावा- मेहंदी लावून गारवा मिळतो. म्हणून मेहंदी लावणे अधिक चांगलेय कलर नसलेली मेहंदी पावडर काही काळ पाण्यात भिजवून ती पायाला लावून ठेवायची. मेहंदी सुकल्यानंतर ती धुवायची. यामुळे पायांना थंड वाटून जळजळ कमी होईल.

रॉक मीठ इच्छित फायदा

पायाची जळडळ कमी करण्यासाठी रॉक सॉल्टचा वापर करता येईल. कोमट पाणी टबात घ्यायचे. त्यात रॉक सोल्ट धालायचे. त्या पाण्यात पाय ठेवून 10 ते 15 मिनिटं बसायचे. असे केल्याने कोणताही त्रास न होता जळजळ कमी होऊन पायाला आराम मिळेल.

हेही वाचा: Type-2 डायबेट्‌सपासून वाचवतील ‘हे’ सात आश्‍चर्यकारक उपाय! फॉलो करा

Apple Cider Vinegar चा पर्याय- Apple Cider Vinegar लावल्याने पायांची जळजळ कमी होऊ शकते. यासाठी एका टबमध्ये पाणी घेऊन त्यात 2-3 चमचे हे व्हिनेगर टाकायचे. त्यात आपले पाय बुडवून ठेवायचे. असे केल्यानेही पायाला जळजळीपासून आराम मिळेल.

करडईची पानेही उपयुक्त- पायाची जळजळ कमी करण्यासाठी करडईची पानेही उपयोगी पडतात. ही पाने चांगली धुवून त्याची थोडीशी घट्ट पेस्ट तयार करायची.ती पेस्ट पाय आणि तळव्यावर लावून 10 मिनिटे ठेवायची. नंतर पाय धुवायचे. असे दिवसातून दोनदा केल्याने पायाला लवकर आराम मिळेल.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here