ऐकायला थोडं विचित्र वाटू शकतं. पण सुप्रसिद्ध अमेरिकन फोटोग्राफर स्पेन्सर ट्युनिक यांनी विविध पर्यावरणीय समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी न्यूड फोटोग्राफीचा मार्ग अवलंबला आहे. नग्न शरिरावर फक्त पांढरा रंग लावून सुमारे २०० लोक मृत समुद्राजवळील वाळवंटात उभे आहेत. त्यांच्या विविध मुद्रा आणि प्रतिमांच्या माध्यमातून विविध समस्या जगासमोर आणण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. मृत समुद्राची पाणी पातळी वर्षाला सुमारे एक मीटरने कमी होत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं.

मृत समुद्राची पाणी पातळी वर्षाला सुमारे एक मीटरने कमी होत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं.

मृत समुद्राची पाणी पातळी वर्षाला सुमारे एक मीटरने कमी होत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं.

५४ वर्षीय सुप्रसिद्द अमेरिकन फोटोग्राफर स्पेन्सर ट्युनिक यांनी जगभरात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात नग्न फोटोग्राफी केली आहे. दक्षिण इस्रायलमधील पर्यटन मंत्रालयानं ट्युनिक यांना आमंत्रित केलं होतं. आटत चाललेल्या मृत समुद्राचे त्यांनी तिसऱ्यांदा चित्रण केले.

इस्रायल आणि जॉर्डनने शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी अपस्ट्रीम पाण्याचा बराचसा भाग वळवला आहे. तर हवामानाच्या संकटामुळे तसेच खनिज उत्खनन आणि बाष्पीभवनामुळे समस्या आणखी गंभीर झाली आहे. दहा वर्षांपूर्वी ट्युनिक यांनी मृत समुद्राच्या किनाऱ्यावर १००० हून अधिक नग्न मॉडेलची छायाचित्रे काढली होती. पाच वर्षांनंतर ते परत येईपर्यंत त्यांच्या पहिल्या चित्रीकरणाच्या ठिकाणावरील पाणी खूप कमी झालं होतं. मागे फक्त क्रस्ट वाळू आणि सिंकहोल दिसत होती.

  हवामानाच्या संकटामुळे तसेच खनिज उत्खनन आणि बाष्पीभवनामुळे समस्या आणखी गंभीर झाली आहे.

हवामानाच्या संकटामुळे तसेच खनिज उत्खनन आणि बाष्पीभवनामुळे समस्या आणखी गंभीर झाली आहे.

अलीकडे केलेल्या या फोटोशूटमध्ये सहभागी झालेली २६ वर्षीय विद्यार्थिनी अ‍ॅना क्लेमन हिने सांगितलं की, पर्यावरणीय संकटाबाबत जागरूकता आणण्यासाठी ती या शूटमध्ये सामील झाली होती. ती म्हणाली, एकदा आपण आपले कपडे काढून टाकले की खरंच नैसर्गिक वाटतं. त्यांना परत घालण्याची तुमची इच्छा होत नाही. आम्हाला फक्त त्या ठिकाणच्या खडकांमुळे थोडा संघर्ष करावा लागला.

सुप्रसिद्ध अमेरिकन फोटोग्राफर स्पेन्सर ट्युनिक यांनी विविध पर्यावरणीय समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी न्यूड फोटोग्राफीचा मार्ग अवलंबला आहे.

सुप्रसिद्ध अमेरिकन फोटोग्राफर स्पेन्सर ट्युनिक यांनी विविध पर्यावरणीय समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी न्यूड फोटोग्राफीचा मार्ग अवलंबला आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here