कोल्हापूर : सुरक्षित प्रवासाची हमी देणाऱ्या एसटी महामंडळाने आवडेल तेथे प्रवास योजना नव्याने सुरू केली आहे. यात चार दिवसांच्या पाससाठी भाडेही निश्चित केले आहे. त्याची अंमलबाजावणी आठवड्यात होणार आहे. सर्वच स्तरांतील प्रवाशांना चार दिवसांत राज्यात कोठेही प्रवास करण्याची संधी आहे.

राज्यभरातील जवळपास १८ हजार बसगाड्यांतून रोज ६४ हजार प्रवाशांची वाहतूक करणारे एसटी महामंडळ महसूल वाढीसाठी प्रयत्नशील आहे. जास्तीत जास्त प्रवाशांना एसटीने सुरक्षित प्रवास करता यावा, तसेच भाडेही किफायतशीर असावे, या दृष्टीने आवडेल तेथे प्रवास योजना राबविली. मध्यंतरीच्या काळात या योजनेला अल्प प्रतिसाद होता. कोरोनानंतर पुन्हा एकदा एसटीचा प्रवासी वाढावा, यासाठी भाडे कमी करून ही योजना नव्याने सुरू केली आहे.

या योजनेत राज्यभरातील चार दिवसांचा प्रवास, त्यासोबत महाराष्ट्राच्या नजीकच्या राज्यातही प्रवास करता येणार आहे. त्यासाठी आंतरराज्य प्रवासी पास काढावा लागणार आहे. एक फोटो व पासचे भाडे भरून राज्यातील सर्व मोठ्या बसस्थानकांवरही पास देण्याची व्यवस्था एसटीने केली आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here