आपल्याकडे असलेल्या स्मार्टफोनवर व्हाट्सअप, इन्स्टा, फेसबुक अशासह फोन बॅकींग, विविध गेम्स, किंडलसारखी अॅप डाऊनलोड केलेली असतात. या ना त्या कारणाने सारखे मॅसेजेस येत असल्याने आपले लक्ष सतत फोनकडे असते. मॅसेज आल्यावर फोन हातात घेतला जातो.परिणामी वापर वाढतो. रात्रीही झोपल्यावर कधी जाग आली तर फोन हातात घेतला जातो. पण फोनकडे असणारे सततचे लक्ष थोडेसे धोकादायक ठरू शकते.

हा होऊ शकतो त्रास – स्मार्ट फोनच्या अतिवापरामुळे डोकेदुखी, सुस्ती, मळमळ, चक्कर येणे, निद्रानाश अशा अनेक समस्यांनी लोकं त्रस्त होतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

असे केले सर्वेक्षण – एका अहवालानुसार दक्षिण कोरियामधील 20 टक्क्यांहून अधिक लोक फोनवर सतत अवलंबून असतात. त्यामुळे धोका वाढला आहे. विज्ञान आणि आयसीटी मंत्रालयाने नॅशनल इन्फॉर्मेशन सोसायटी एजन्सीने केलेल्या सर्वेक्षणाचा हवाला दिला आहे. त्यात देशातील 23.3 टक्के लोक स्मार्टफोनवर अवलंबून राहत असल्याचे म्हटले आहे. हे प्रमाण गेल्यावर्षीच्या तुलनेत 3.3 टक्यांनी वाढले आहे.

दक्षिण कोरियातील 15,000 लोकांवर त्यांच्या स्मार्टफोन वापराविषयी सर्वेक्षणादरम्यान प्रश्न विचारण्यात आले. त्यात फोनवर जास्त अवलंबून असल्याने 19.3 टक्के लोकांना धोका असून 4 टक्के लोकांना याचा धोका सर्वाधिक असल्याचे सर्वेक्षणात आढळले. ज्यांचे स्मार्टफोनच्या वापरावर नियंत्रण नाही, अशा लोकांचा समावेश यावेळी करण्यात आला होता.

प्रयत्न आवश्यक – फोनची ही सवय कमी करायची असेल तर त्या व्यक्तीलाच प्रयत्न करणे अतिशय गरजेचे आहे. मात्र याबाबत फोन वापरणाऱ्या 61 टक्के लोकांनी स्वतः प्रयत्न करत फोनपासून दूर राहणे गरजेचे असल्याचे योनहॅप वृत्तसंस्थेच्या अहवालात म्हटले आहे. तर, 1702 लोकांनी यासाठी सरकारला दोष दिला असून 21.18 लोकांनी कंपन्यांना दोषी ठरवले असल्याचे अहवालात म्हटले आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here