अभिनेता सुयश टिळक आणि आयुशी भावे यांच्या हळद आणि मेहंदीचा कार्यक्रम नुकताच पार पडला आहे. या कार्यक्रमाचे खास फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पाहुयात, सुयश-आयुषीच्या हळदीचे खास क्षण..

१९ ऑक्टोबर रोजी सुयश-आयुशीची हळद पार पडली.
मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
सुयश आणि आयुशी लवकरच आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात करणार आहेत.
मराठी कलाविश्वातील अनेक कलाकारांनी सुयश-आयुशीवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
जुलै महिन्यात सुयश टिळकने सोशल मीडियावर त्याच्या साखरपुड्याचे फोटो पोस्ट करत चाहत्यांना सुखद धक्का दिला होता.
आयुशीच्या वाढदिवशीच सुयशने चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली होती.
आयुशी भावे ही अभिनेत्री आणि डान्सर आहे. ‘युवा डान्सिंग क्वीन’मध्ये तिने सहभाग घेतला होता.
‘माझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट सुंदर करणारी स्त्री. तुझ्यासारखी जोडीदार भेटण्यासाठी मी खूप नशिबवान आहे. आम्ही दोघं नव्या प्रवासाची सुरुवात करत आहोत’, असं कॅप्शन देत सुयशने साखरपुड्याचे फोटो पोस्ट केले होते.
या दोघांच्या केळवणाचे खास फोटो..
सुयश-आयुषी

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here