सातारा : जिल्हा बॅंक सहकारातील (Satara Bank Election) अग्रगण्य बॅंक असून येथे फारसे राजकारण नाही, हे सांगायला बरे वाटते, म्हणण्यापेक्षा अभिमान वाटतो. या बॅंकेच्या माध्यमातून हौसिंग सोसायटी आणि दुग्ध संस्थांचे प्रतिनिधीत्व करताना सहकाराचा जास्तीत जास्त लाभ सभासदांना होण्यासाठी प्रयत्न केला आहे. सभासदांच्या इच्छेनुसार याच मतदारसंघातून निवडणूक लढण्याचे निश्‍चित केले आहे. त्यास भरभरुन आशीर्वाद दयावेत, असे आवाहन खासदार उदयनराजे भोसले (MP Udayanraje Bhosale) यांनी केले.

दरम्यान, सहकार चळवळीचा मुळ उद्देश बाजूला पडला असून, शेतकऱ्यांपेक्षा स्वतःचा स्वार्थ साधण्याच्या प्रयत्नामुळे शेतकरी सभासदांवर होणारा अन्याय एक व्यक्ती म्हणून आम्ही सहन करणार नाही. त्यांचा बंदोबस्त करु, असा घणाघात त्यांनी केला आहे. सातारा जिल्हा बॅंकेच्या गृहनिर्माण आणि दुग्धविकास सहकारी संस्था मतदारसंघातील मतदार सभासद-कार्यकर्त्यांचा मेळावा येथील हॉटेल लेक व्हयु येथे आज आयोजिला होता.या वेळी भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष भरत पाटील, गितांजली कदम, कराड नगरपरिषदेचे गटनेते राजेंद्रसिंह यादव, महाबळेश्‍वरचे माजी सभापती विजयराव भिलारे, प्रा.आर.के.पाटील, आनंदराव गोळे, जयवंतराव बनसोडे, रत्नमाला निकम यांची प्रमुख उपस्थिती होती.

हेही वाचा: उदयनराजेंनी केलेल्या पराभवाचा सहकारमंत्री वचपा काढणार?

सातारा बँक निवडणूक

सातारा बँक निवडणूक

आपले मत महत्वाचे आहेच, कारण उदयनराजे स्वतःच्या एकट्याच्या मतावर निवडून येऊ शकत नाहीत, हे खरं असलं तरी आपले वैचारिक मत आम्हाला अधिक महत्वपूर्ण आहे, असे त्यांनी सांगितले. या वेळी राजेंद्रसिंह यादव, विजयराव भिलारे, भरत पाटील यांनी मनोगतात सभासदांच्या उज्वल भविष्यासाठी खासदार उदयनराजे भोसले हे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या संचालक मंडळावर असलेच पाहिजेत, असे मत मांडले. शिरीष चिटणीस यांनी सूत्रसंचालन केले. या वेळी काका धुमाळ, बाळासाहेब ननावरे, नानासाहेब शिंदे, सुनील काटकर, सुनील सावंत, डॉ. महेश गुरव, फिरोज शेख, अ‍ॅड. विनित पाटील, अ‍ॅड. अंकुश जाधव, अ‍ॅड. विकास पवार, रणजित माने, संग्राम बर्गे, चंद्रकांत भोसले, बाळासाहेब राक्षे, लक्ष्मण कडव, जयवंत पवार आदी उपस्थित होते.

हेही वाचा: राष्ट्रवादीच्या आमदाराचा करिष्मा; खंडाळा कारखान्यावर निर्विवाद वर्चस्व

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here