अभिनेते आदेश बांदेकर Adesh Bandekar यांनी ‘होम-मिनिस्टर’ Home Minister या कार्यक्रमाद्वारे महाराष्ट्राचं महावस्त्र ‘पैठणी’ देऊन गेली १७ वर्षे तमाम वहिनींचा सत्कार व सन्मान केला आहे. पण यावेळी झी मराठी अवॉर्ड्स २०२१ मध्ये बांदेकर भावोजींनी चक्क बॉलिवूडमधल्या सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा पैठणी देऊन सन्मान केला. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून कतरीना कैफ Katrina Kaif आहे.

कतरिनाने तिच्या अभिनय आणि सौंदर्याने फक्त भारतातीलच नाही तर संपूर्ण जगभरातील तिच्या चाहत्यांना भुरळ पाडली आहे. नुकत्याच पार पडलेल्या झी मराठी पुरस्कार सोहळ्यात कतरीना कैफ आणि रोहित शेट्टी यांनी त्यांच्या आगामी ‘सूर्यवंशी’ या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त हजेरी लावली. यावेळी भावोजींनी कतरिनाचं स्वागत अगदी मराठमोळ्या पद्धतीत, महाराष्ट्राचं महावस्त्र तिला भेट देऊन केलं. हे पाहून कतरिनासुद्धा भारावून गेली. प्रेक्षकांना हा क्षण लवकरच छोट्या पडद्यावर पहायला मिळणार आहे. हा सोहळा प्रेक्षकांना शनिवारी ३० ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ७ वाजता पाहायला मिळेल.

हेही वाचा: अपघातानंतर मराठी अभिनेत्री अंथरुणाला खिळून; गमावले अनेक प्रोजेक्ट्स

रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट येत्या ५ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात कतरिना कैफसोबत अक्षय कुमार, रणवीर सिंग आणि अजय देवगण यांच्या भूमिका आहेत. चित्रपटगृहांमध्येच हा चित्रपट प्रदर्शित व्हावा अशी टीमची इच्छा होती. त्यामुळे लॉकडाउनदरम्यान त्यांनी ओटीटीवर चित्रपट प्रदर्शित न करता तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here