सगळ्यांना नियमित व्यायामाचे फायदे माहीत आहेत. त्याने शरीराचा आकार आणि शरीरातील क्रिया व्यवस्थित सुरु राहते. त्यामुळे प्रत्येक निरोगी व्यक्तीने ४५-५० मिनिटे नियमित व्यायाम करावा. जर तुम्ही व्यायाम थांबवले तर त्याचा शरीरावर काय परिणाम होईल?
व्यायाम न केल्यास त्याचा शरीरावर काय परिणाम होतो?
काही सवयी जसे की दारुपिणे, धुम्रपान, बाहेरचे पदार्थ जास्त खाणे याचा आपल्या शरीरावर परिणाम होतो. तसेच स्नायूंची हालचाल होत नाही. हे चांगले नाही. नियमित व्यायाम न केल्याने म्हातारपण, तसेच शारीरिक धोका आणि तंबाखू खाल्ल्याने किंवा मधुमेहाने जागतिक पातळीवर सर्वाधिक मृत्यू होतात, असे लॅन्सेट या प्रसिद्ध नियतकालिकेत प्रसिद्ध झालेल्या शोध निबंधात स्पष्ट झाले आहे. एखादा दिवस किंवा आठवडा व्यायाम न केल्याने शरीराला काही होत नाही. जर तुम्ही दररोज व्यायाम न केल्यास काय होऊ शकते. त्याविषयी सांगणार आहोत..
हृदयाची कार्यक्षमता कमी होईल
व्यायाम तुमचे हृदयाला क्रियाशील ठेवते. ऐरोबिक आणि कार्डिक व्यायामाने हृदय चांगले काम करते. तसेच हृदयसंबंधित धोके टाळता येऊ शकतात. तथापि तुम्ही बरेच दिवस शारीरिक हालचाल केली नाही. त्याचा तुमच्या हृदयाच्या क्रियांवर परिणाम होईल. त्याचा तुमच्या दररोजच्या कामावर परिणाम होईल. यातून हृदयासंबंधित विकारात वाढ होऊ शकते.
हेही वाचा: लठ्ठपणा व मधुमेह टाळण्यासाठी शासन देणार दररोज टीप्स

स्नायू दुर्बल होतील
व्यायामाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे स्नायूचेपेशी या चांगल्या स्थितीत राहतात आणि त्यांची ताकदही वाढलेली असते. जर तुम्ही व्यायामाकडे दुर्लक्ष केल तर तुमच्या स्नायूतील ताकद कमी होते. तसेच तुम्हाला अशक्तपणा वाटायला लागतो. साधारण हलकी वस्तु उचलणेही अवघड होऊन बसते. स्नायू पूर्वी कार्यक्षम आणि त्याच्याकडून मदत मिळत नाही. दुर्बल स्नायूमुळे दररोजचे काम करणे कठीण होऊन बसते.

चांगल्या झोपेसाठी धडपड
व्यायायामुळे चांगली झोप लागते. त्यावर तुमचा विश्वास असो किंवा नसो पण हे खरे आहे. झोप व्यवस्थित झाल्यास शरीराचा थकवा निघून जातो. त्यामुळे व्यायाम खूप महत्त्वाची भूमिक बजावतो. चांगली झोप लागत नाही. याचा अर्थ तुम्हाला शारीरिक हालचाली करणे गरजेचे आहे. त्या बरोबरच अपुऱ्या झोपेमुळे विविध व्याधी जडू शकतात.

शारीरिक क्षमतेवर परिणाम
व्यायायामुळे तुमचा स्टॅमिना वाढतो. तसेच शारीरिक क्षमता वाढते. याच जोरावर तुम्ही काही करु शकता.

रक्तातील साखरेच्या प्रमाणात अस्थिरता
टाईप २ मधुमेह हा खूप धोकादायक आहे. या प्रकारचे प्रमाण भारतात जास्त आहे. शारीरिक हालचाल नसल्यास रक्तातील साखर अस्थिर होते. व्यायामाने तुमचे शरीर कार्बोहायड्रेटवर प्रक्रिया करते. जर व्यायाम न केल्यास मधुमेह वाढतो.
Esakal