स्त्रियांचे आरोग्य जसे महत्वाचे आहे तसेच पुरूषांनीही त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे आहे. पण अनहेल्दी डाएट आणि बदलत्या लाईफस्टाईलचा फटका पुरूषांना बसत आहे. त्यांच्या शरीराला आवश्यक असणारी पोषणमुल्ये मिळण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या गंभीर आजारांना सामोरे जावे लागत आहे. त्याचे कारण आहे जीवनसत्वे आणि खनिजे (Vitamins and Minerals) यांची कमतरता. त्यामुळे आहारात योग्य घटकांचा समावेश करणे आवश्यक आहे.

डी-व्हिटॅमिन
फोलिक अॅसिड- शरीरात फोलिक अॅसिड ती कमतरता असेल तर तुमच्या हृदय आणि मेंदूच्या कार्यावर परिणाम होऊ शकतो. परिणामी अल्झायमरची भीती वाढते. हे टाळायचे असेल तसचे रक्ताचा प्रवाह नियंत्रित करायचा असेल तर फोलिक अॅसिड चे प्रमाण पुरेसे असणे गरजेचे आहे.
व्हिटॅमिन डी- तुमच्या शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता असेल तर हाडांशी संबधित समस्या उद्भवू शकतात. मात्र हे टाळायचे असेल तर योग्य आहार घ्या, पुरेसा सूर्यप्रकाश मिळवणेही गरजेचे आहे.
जस्त – चांगल्या प्रतिकार शक्तीसाठी जस्ताची गरज असते. मात्र त्याची कमतरता असेल तर पुरुषांना एक्झामा होऊ शकतो. तसेच दमा आणि उच्च रक्तदाबाचा धोकाही वाढतो.
लोह – लोहाच्या कमतरतेमुळे अनेक गंभीर आजार होण्याची शक्यता आसते. रक्तातल्या हिमोग्लोबीनसाठी लोहाची शरीराला खूप गरज असते. त्याच्या कमतरतेमुळे अशक्तपणा येऊ शकतो.
ओमेगा थ्री फॅटी एसिड- ओमेगा -3 फॅटी एसिड घेतल्याने तुमची हा़डे, केस आणि त्वचा चांगली राहू शकते. तसेच दूध, दही, पनीर यांच्या नियमित सेवनाने ते मिळू शकते. त्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहतोच. शिवाय हृदयरोगाचा धोका कमी होतो.
सेलेनियम- सेलेनियममधे उच्च ॲन्टिऑक्सिडंट गुणधर्म असतात. म्हणून आरोग्याच्या दृष्टीने ते फायदेशीरआहे. भातात याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे असे पदार्थ खाल्ल्याने तुमच्या शरीराला सेलेनियम योग्य मिळाल्यास प्रोस्टेट कर्करोगाचा धोका कमी होतो. तसेच फुफ्फुसांच्या कर्करोगासारख्या गंभीर आजारांपासून तुम्ही दूर राहू शकता.
हेही वाचा: हाडांची बळकटी वाढवण्यासाठी आहारात करा ‘या’ घटकांचा समावेश
आहारात करा जीवनसत्त्वे, खनिजांचा समावेश – शरीराला आवश्यक पोषणतत्वे मिळण्यासाठी योग्य आहार घेतला पाहिजे. त्यासाठी आहारात जीवनसत्त्वे आणि खनिजे यांचा वापर असलेले पदार्थ खाल्ले पाहिजेत. या व्यतिरिक्तही जर पुरेशी पोषणमुल्ये मिळत मसलतील तर डॉक्टरांच्या सल्ल्याने व्हिटॅमिन सप्लीमेंट घेता येऊ शकतात.
या आजाराचा धोका अधिक- वयानुरूप पुरुषांमध्ये प्रोस्टेट कर्करोगाचा धोका वाझतो. इरेक्टाइल डिसफंक्शनची समस्या निर्माण होऊ शकते. म्हणून योग्य प्रमाणात जीवनसत्त्वे आणि खनिजांचे सेवन करून हृदयरोग, कोलेस्टेरॉल आणि रक्तदाबावर नियंत्रण मिळवता येऊ शकते.
Esakal