लोकप्रिय ब्लॉगर आणि वकील असणारी संजना ऋषी हिला पुन्हा ट्रोल करण्यात येते आहे. 2020 साली तिने लग्नात घातलेल्या कपड्यांमुळे ती चर्चेत आली होती. आता प्रेग्नसीत केलेल्या फोटोशुटमुळे तिला पुन्हा ट्रोल करण्यात येत आहे.

2020 साली तिने बॉयफ्रेड ध्रुव महाजनबरोबर लग्न केले. या लग्नात तिने पावडर ब्लु रंगाची सफारी घातली होती. त्याचबरोबर गळ्यात डायमंड नेकलेस आणि बिंदी लावली होती.
लग्नानंतर एक वर्षांनी संजना गर्भवती आहे. तिने नुकतेच फोटोशूट केले.
संजनाने लग्नात जो ब्लेझर घातला होता. तो यावेळी घालून त्यावर फुले आणि पट्टे असलेल्या पॅटर्नची साडी नेसली आहे. अत्यंत बोल्ड अंदाजात तिने आपला लूक कॅरी केला आहे.
इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत तिने, गेल्यावर्षी माझ्या कपड्यांमुळे ज्यांनी मला ट्रोल केले होते, त्यांना मी यावेळी साडी नेसली आहे, असे सांगू इच्छिते असे म्हटले आहे.
तिचे हे फोटोशूट मात्र चांगलेच चर्चेत आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here