T20 World Cup 2021: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील राजकीय संबंध अतिशय तणावपूर्ण आहेत. त्यामुळेच गेल्या कित्येक वर्षात भारत आणि पाकिस्तान यांच्यात ICC च्या स्पर्धा वगळता इतर वेळेस क्रिकेट सामने झालेले नाहीत. कोरोनाकाळात पाकिस्तानच्या काही माजी खेळाडूंनी भारताशी क्रिकेट सामने पुन्हा सुरू खेळले जायला हवेत असं मत मांडलं. भारतीय क्रिकेटपटू आणि क्रिकेट फॅन्सने या ऑफरला फारशी किंमत दिली नाही. पण, आता टी२० विश्वचषक स्पर्धेत मात्र हे दोन संघ आमनेसामने येणार आहेत. त्यामुळे या सामन्यात भारताने कोणते ११ खेळाडू खेळवावेत याबद्दल भारताचा माजी क्रिकेटपटू पार्थिव पटेलने मत व्यक्त केलं आहे.
हेही वाचा: T20 WC: टीम इंडियाचा ‘हा’ खेळाडू सामना फिरवू शकतो – लक्ष्मण
“विराट कोहली कर्णधार असल्याने त्याला नक्कीच संघ कसा असावा याची कल्पना आहे. मला असं वाटतं की केएल राहुल आणि रोहित शर्मा यांनी डावाला सुरूवात करावी. विराटने तिसऱ्या, सूर्यकुमार यादवने चौथ्या आणि हार्दिक पांड्याने पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला यावे. त्यानंतर मॅच फिनिशर म्हणून रविंद्र जाडेजाने सहाव्या क्रमांकावर खेळावं. गोलंदाजीबाबत बोलायचं तर राहुल चहर, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांना संघात स्थान मिळायलाच हवं. त्यासोबत शार्दूल ठाकूर आणि भुवनेश्वर कुमार यांनाही संघात संधी देण्यात यायला हवी”, असे पार्थिव पटेल म्हणाला.
हेही वाचा: T20 WC: ‘मेंटॉर’ धोनीचा पहिला फोटो व्हायरल; लाईक्सचा वर्षाव!

IND vs PAK
“मी BCCI अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह यांच्याशी संवाद साधला. मी त्यांना विनंती केली की राजकारण बाजूला ठेवून खेळ जसा आहे तसा सुरू ठेवायला हवा. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेटमधले संबंध तरी नक्कीच सुधारले जायला हवेत. भारत-पाक क्रिकेटला पूर्ववत आणण्यासाठी खूप प्रयत्न करावा लागतील यात वादच नाही. पण आमच्यात चांगली चर्चा झाल्याने भविष्यात चांगल्या गोष्टी घडू शकतील”, असा विश्वास रमीझ राजाने व्यक्त केला.
Esakal