जर अंडे खाण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घेतली नाही तर ते तुमच्या आरोग्यासाठी मोठे नुकसानदायी ठरू शकते.
जर अंडे खाण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घेतली नाही तर ते तुमच्या आरोग्यासाठी मोठे नुकसानदायी ठरू शकते. तज्ज्ञांचे म्हणणे आहे, की काही अंड्यांमध्ये आढळणारे धोकादायक जीवाणू एखाद्या व्यक्तीला गंभीर आजारी बनवू शकतात. म्हणून ऑम्लेट करणे किंवा उखडवण्यापूर्वी अंडे तपासणे कधीही चांगले.

यूएस डिपार्टमेंट ऑफ ऍग्रीकल्चरने (यूएसडीए) जीवाणू असलेले अंडे कसे ओळखावे याबाबत माहिती दिली आहे. त्यांच्यानुसार, जर तुम्हाला अंड्याच्या पांढऱ्या रंगात गुलाबी रंग दिसला तर ते लगेच फेकून देणे चांगले. अंड्याच्या सामान्य रंगात बदल हे स्यूडोमोनास बॅक्टेरियाचे लक्षण असू शकते. या जीवाणूंनी संक्रमित झालेले अंडे खाल्ल्याने अन्न विषबाधा किंवा गंभीर समस्या उद्भवू शकते.

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, हा जीवाणू अंड्यात हलका हिरवा आणि पाण्यात विरघळणारा द्रव तयार करतो. जर तुम्हाला अंड्याच्या पांढऱ्या भागामध्ये काही बदल दिसला तर ते अजिबात खाण्याची चूक करू नका. एक अभ्यासानुसार असे स्पष्ट होते की, जर तुम्हाला अंड्यात गुलाबी किंवा इंद्रधनुष्यी रंग दिसला तर ते फेकून द्या. या अंड्याला स्यूडोमोनास बॅक्टेरियाची लागण होऊ शकते.

पोल्ट्री सायन्समध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, खराब झालेल्या अंड्यांना काहीसा आंबट, कडक किंवा फळांसारखा वास येतो. अशा अंड्यांच्या जर्दीवर पांढरा आणि तंतुमय थर येतो, जो नंतर हलका तपकिरी होतो. तथापि, अंड्याचा पांढरा रंग बदलणे नेहमीच अंडे खराब असण्याचे लक्षण नसते. यूएसडीएच्या मते, कधीकधी अंड्यातील जर्दीचा पिवळा रंग कोंबड्यांच्या आहारावर अवलंबून असते. अन्न प्राधिकरणाचे तज्ज्ञ म्हणतात की, जर कोंबडीला पिवळ्या किंवा केशरी रंगाच्या वस्तू खाण्यात आल्या तर जर्दीचा रंग गडद पिवळा होतो.

कोणत्या तापमानात अंडे ठेवले पाहिजेत?
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, अंडे त्याच कार्टनमध्ये ठेवल्या पाहिजेत ज्यासह ते येतात. फ्रीजरमध्ये ठेवताना आपण काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. अंडे रेफ्रिजरेटरमध्ये 45 अंश फॅरेनहाइट किंवा त्यापेक्षा कमी ठेवावे. यामुळे अंडे खराब होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो.
अन्न

स्वादिष्ट आणि पौष्टिक अंडे हा प्रथिनांचा सर्वोत्तम स्रोत मानला जातो. पण जर काही गोष्टींची खाण्यापूर्वी काळजी घेतली नाही, तर हे अंडे तुमच्या आरोग्याला मोठी हानी पोचवू शकते. तज्ज्ञांचे म्हणणे आहे, की काही अंड्यांमध्ये आढळणारे धोकादायक जीवाणू एखाद्या व्यक्तीला गंभीर आजारी बनवू शकतात. म्हणून ऑम्लेट करण्यापूर्वी किंवा उखडवण्यापूर्वी ते तपासणे चांगले.
Esakal