करवा चौथच्या व्रताची सुरवात सरगी पासून होते. व्रत करणाऱ्या सुवासिनी महिला पहाटे उठून सरगी खातात. सरगीमधील पदार्था सुवासिन महिलांच्या सासू बनवितात. सरगी खाल्यानंतर महिला दिवसभर काहीच खात नाही. इतकेच नव्हे तर चंद्र दिसेपर्यंत पाण्याचा घोट देखील घेत नाही. सुवासिनी महिला पतीला दिर्घायुष्य मिळावे यासाठी व्रत ठेवतात आणि आपले प्रेम व्यक्त करतात आणि या दिवशी पुरुष आपल्या पत्नीसाठी काहीतरी स्पेशल गिफ्ट देतात. या करवा चौथला आम्ही तुम्हाला असे गिफ्ट सुचवाणार आहोत जे तुमच्या पत्नीला नक्की आवडतील. तुमच्या पत्नीला हे गिफ्ट देऊन प्रेम व्यक्त करू शकता……ट्राय करा हे पर्याय.

प्रेम व्यक्त करण्यासाठी प्रेमाशिवाय दुसरा काय पर्याय आहे का? लाल गुलाबांचा सुंदर पुष्प गुच्छ तुम्ही करवा चौथला आपल्या पत्नीला देऊन तुमचे प्रेम आणि आदर व्यक्त करू शकता. तुम्ही तो गुच्छ कस्टमाईझ्ड करून घेऊ शकता आणि त्यासोबत छोटेसे ग्रिटींग कार्ड देऊन आपल्या भावना व्यक्त करू शकता.

महिलांना डायमंड्स खूप आवडतात त्यामुळे तुम्ही तुमच्या पत्नीला डायमंड्स ज्वेलरी दिली तर त्यांना नक्की आवडेल. सुंदर पेंडट किंवा छान कानातले तुम्ही त्यांनी गिफ्ट देऊन स्पेशल फिल करून देऊ शकता.

महिलांना मेकअप करायला खूप आवडते त्यामुळे तुम्ही पत्नीला मेकअप किट गिफ्ट देऊन शकता.

करवाचौथला तुम्ही तुमच्या पत्नीसाठी सर्वात मौल्यवान भेट म्हणून तुमचा थोडा वेळ देऊ शकता. तुमच्या पत्नीच्या आवडीच्या रेस्टोरंटमध्ये तिला सरप्राईज डेटवर घेऊन जाऊ शकता.

करवा चौथ ला तुम्ही तुमच्या पत्नीला डिझाईनर साडी देऊ शकता. ज्वेलरी कलेक्शन सोबत डिझाईनर साडी गिफ्ट दिल्यास तुमच्या पत्नीला नक्कीच स्पेशल फिल होईल.

तुम्ही पत्नीला डिझाईनर बॅग देखील गिफ्ट देऊ शकता. महिलांसाठी बॅग हे परफेक्ट गिफ्ट आहे, डिझाईनर बॅग पाहून तुमची पत्नी नक्की खुश होईल.

तुम्ही जर करवा चौथला तुमच्या पत्नीला एखादे सुंदर घड्याळ भेट दिले तरी त्यांना नक्कीच आवडेल. तुम्ही मार्केटमध्ये ट्रेंडमध्ये असलेले एखादे हटके स्टाईल घड्याळ गिफ्ट देऊ शकता.
Esakal