राशिवडे बुद्रुक (कोल्हापूर) : येळवडे (Yelevade, Radhanagri) (ता. राधानगरी ) येथील जुन्या धाटणीचे माडीचे ते घर आज सजले होते. दारात रांगोळी आणि फुलांच्या पायघड्या होत्या. घरातल्या चिमुकल्या मुलीचे बारसे होते आणि घराला प्रतीक्षा होती आत्या येण्याची. दुपारी ‘त्या’ आल्या; चिमुकलीला कवेत घेतलं, कौतुक केलं आणि पाळण्यात ठेवून कौतुकाने नामकरणही केले. या मुलीच्या आत्या होत्या भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा (Chitra Wagh) चित्राताई वाघ.

येळवडे : सुरक्षारक्षकाच्या मुलीचे कोड कौतुक करताना चित्राताई वाघ.

येळवडे : सुरक्षारक्षकाच्या मुलीचे कोड कौतुक करताना चित्राताई वाघ.

येळवडे येथील अंजली शेळके यांच्या नातीचे आज बारसे. पती साथ सोडून गेल्यानंतर गेल्या पाच वर्षापासून त्या आपल्या तीन मुली आणि मुलासह संसार सांभाळत आहेत. हातात खोरे- कुदळ घेवून शेती सांभाळणाऱ्या या महिलेच्या पहिल्या मुलीचे प्रज्ञाचे लग्न दोन वर्षांपूर्वी झाले. ठिकपुर्ली येथील पोलीस दीपक पाटील हे त्यांचे जावई. ते सध्या चित्राताईंचे सुरक्षा रक्षक आहेत. दीपक यांना मुलगी झाल्याचे कळताच तिच्या बारशाला येण्याचे सौ. वाघ यांनी निश्चित केले आणि तो दिवस आज उजाडला.

हेही वाचा: सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याबाबत मुश्रीफांची मोठी घोषणा

श्रीमती शेळके यांच्या जुन्या दगडी बांधकामाच्या माडीच्या घराला आज फुलांचे तोरण लागले होते. नेहमी पेक्षा आज बारशाचा डामडौल जरा वेगळा होता. मोजकेच पाहुणे असले तरी मराठमोळ्या धाटनीत स्वागत’ फुलांच्या रांगोळ्यांनी झाले. सौ. वाघ या दुपारी येताच त्यांचे औक्षण करून स्वागत झाले. घरात येऊन ‘आत्या’ चित्राताई यांनी चिमुकलीला मांडीवर घेतले. ‘ बेटी म्हणजे धनाची पेटी… ज्या घरात मुली जन्माला येतात त्या घरात लक्ष्मी वास करते’ असे सांगून तीचे ‘ श्रीजा’ असे नामकरण केले, पाळणाही म्हंटला. या घरगुती कार्यक्रमात सहभागी झाल्याचा आनंद ही त्यांनी व्यक्त केला. सबंध कुटुंबात एकरूप झाल्या. या कार्यक्रमात पाटील आणि शेळके कुटुंबीय मोजकेच पाहुणे सहभागी झाले होते. सामान्य कुटुंबाच्या या छोटेखानी कार्यक्रमाची सौ. वाघ यांच्या सहभागाने उंची मात्र वाढली होती.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here