नागपूर : जर्दाळू अत्यंत पौष्टिक आहे. हिवाळ्यात जर्दाळूचे सेवन करायला हवे. यात तंतुमय पदार्थांचे प्रमाण जास्त असते. आरोग्याच्या दृष्टीने हे फळ फायदेशीर आहे. यामध्ये भरपूर प्रमाणात औषधी गुणधर्म आहे. तब्येत आणि त्वचेसाठी हे फळ अत्यंत लाभदायक मानले जाते. जर्दाळू खाल्ल्याने काय फायदे होतात ते पुढील प्रमाणे…

वजन कमी करण्यासाठी जर्दाळूचे सेवन करता येईल. यातल्या फायबरमुळे पोट बराच काळपर्यंत भरलेले राहते. परंतु, जर्दाळूचे सेवन प्रमाणातच करायला हवे.
जर्दाळूमध्ये लोहही भरपूर प्रमाणात असते. यामुळे शरीरातली लोहाची कमतरता भरून निघते.
अनियमित आणि खराब आहाराचा सर्वांत जास्त आणि लवकर प्रभाव लिव्हरवर पडतो. जर्दाळू खाल्ल्याने लिव्हर सुरक्षित राहते.
जर्दाळूतले पोषक घटक त्वचेसाठीही लाभदायी ठरतात. यातल्या ‘क’ आणि ‘ई’ या जीवनसत्त्वांमुळे त्वचेला आवश्यक पोषण मिळते.
जर्दाळू डोळ्यांसाठीही लाभदायी आहे. तसेच यामुळे पचनसंस्थेचे कार्यही सुधारते.
जर्दाळूमध्ये विविध प्रकारचे फ्लेवोनॉईड्स एकत्रितपणे असतात. जे अँटी-इफ्लेमेटरीचे काम करते. सूज उतरण्यासही त्यांची मदत होते.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here