T20 World Cup: भारताचा माजी वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसाद याने मंगळवारी टीम इंडियाचा ‘यॉर्कर किंग’ जसप्रीत बुमराह याची तोंडभरून स्तुती केली. जसप्रीत बुमराह हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एक प्रतिभावान गोलंदाज आहे. प्रतिस्पर्धी संघाच्या धावा रोखण्याचे कसब त्याच्या अंगी आहे. प्रसादने आपल्या मुलाखतीत दक्षिण आफ्रिकेचे दोन वेगवान गोलंदाज कगिसो रबाडा आणि एन्रिक नॉर्खिया या दोघांच्याही कामगिरीची स्तुती केली.

हेही वाचा: T20 World Cup: भारत-पाक सामन्याचे समालोचन मराठीतून!

“जसप्रीत बुमराह हा अतिशय कंजूष गोलंदाज आहे. पण ही कमला केवळ वेगवान गोलंदाजीच्या जोरावर करता येत नाही. गोलंदाजी सातत्याने करण्यात येणार बदल आणि खेळाची परिस्थिती समजून घेण्याची परिपक्वता याच्यामुळे आपली गोलंदाजी अधिक प्रभावी ठरते. नुकतंच झालेल्या IPL मध्ये RCB चा हर्षल पटेल याने उत्तम गोलंदाजी करून दाखवली. तो फारसा वेगाने गोलंदाजी करत नाही. पण त्याने सातत्याने त्याच्या वेगात बदल केला आणि त्यामुळेच त्याला चांगली कामगिरी करणं शक्य झालं”, असं व्यंकटेश प्रसाद म्हणाला.

जसप्रीत बुमराह

जसप्रीत बुमराह

दरम्यान, भारतीय संघाचा टी२० वर्ल्ड कपमधील सलामीचा सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आहे. भारताचा संघ पाकिस्तानशी भिडणार असून २४ ऑक्टोबरला हा सामना रंगणार आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली हा संघ पहिल्यांदाच मैदानात उतरणार आहे. तसेच, विश्वविजेता माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा संघाचा मार्गदर्शक असणार आहे.

जसप्रीत-बुमराह

जसप्रीत-बुमराह

“दक्षिण आफ्रिकेचे नॉर्खिया आणि रबाडा हे देखील खूप वेगवान आहे. त्यांच्याकडे चातुर्य आहेत त्यामुळे ते चांगली कामगिरी करतात. इंग्लंडचा जोफ्रा आर्चरदेखील ताशी १५० किमीच्या वेगाने गोलंदाजी करण्याची क्षमता राखतो. असं असूनही त्याच्या गोलंदाजीत बदल असतात”, असं त्याने अधोरेखित केलं.

हेही वाचा: T20 WC: ‘मेंटॉर’ धोनीचा पहिला फोटो व्हायरल; लाईक्सचा वर्षाव!

भारताच्या संघाने नुकत्याच झालेल्या सराव सामन्यात इंग्लंडला पराभूत केले. या सामन्यात लोकेश राहुल आणि इशान किशन या दोघांनी दमदार कामगिरी करून दाखवली. लोकेश राहुलने ५१ धावा केल्या. तर इशान किशनने नाबाद ७० धावा केल्या. तसेच, ऋषभ पंतनेही शेवटच्या टप्प्यात चांगली कामगिरी केली.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here