जळगाव : कोरोनामुळे (Corona) दीड वर्षापासून बंद असलेली महाविद्यालये (Colleges) आज पासून सुरू झाली आहेत. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ संलग्न महाविद्यालये सुरू करण्यासंबंधी सूचनांनुसार कोरोनाबाबत दिशानिर्देशांचे पालन करून आज महाविद्यालयातील कॅम्पस विद्यार्थ्यांनी फुलला. विद्यार्थी व शिक्षकांकडून शासनाच्या निर्णयाचे स्वागत यावेळी करण्यात आले.

हेही वाचा: नंदुरबारः वाल्हेरी-ढेकाटी परिसरात सागवान वृक्षांची कत्तल

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने उच्च व तंत्र शिक्षण विभागाने महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानुसार कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशी संलग्नीत सर्व महाविद्यालये, मान्यताप्राप्त परिसंस्था व विद्यापीठ प्रशाळांचे वर्ग सुरू झाले आहेत. सर्व महाविद्यालयांना स्थानिक स्थिती लक्षात घेऊन ५० टक्के क्षमतेने वर्ग सुरू केली आहे.

महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या रेलचेल

कोरोनाच्या पासून बंद असलेल्या महाविद्यालयाच्या परिसरात आज विद्यार्थीची रेलचेल आज सकाळ पासून दिसत होती. वर्गांमध्ये प्राध्यापक विद्यार्थ्यांना शिकवीत होते. तर महाविद्यालयाच्या परिसरात मित्र मैत्रणी सोबत फिरतांना दिसत होते.

दोन्ही लस घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश

महाविद्यालयात येण्यासाठी दोन्ही लसीचे डोस घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश देणाच्या शासनाचे सुचना आहे. त्यानुसार महाविद्यालयात दोन्ही लस घेणाऱ्या विद्यार्थ्यांना येवू देत असल्याचे चित्र दिसत होते. तर महाविद्यालय प्रशांकडून लस घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा माहिती घेत आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here