नागपूर : कटुक ही एक आयुर्वेदिक वनौषधी आहे. डोंगराळ भाग तसेच पर्वतरांगांमध्ये आढळणारी कटुक ही अत्यंत दुर्मीळ वनौषधी मानली जाते. औषधी गुणधर्मांमुळे आयुर्वेदिक औषधांमध्ये कटुकचा वापर केला जातो. कडवट चव असणाऱ्या कटुकच्या गुणधर्मांविषयी जाणून घ्या…

वजन कमी करायचे असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने कटुकचे सेवन करता येईल. कटुकमुळे पचनशक्ती सुधारते. तसेच चयापचय क्रियेची गती वाढल्यामुळे वजन कमी व्हायला मदत होते.
कटुकमध्ये दाह कमी करणारे गुणधर्म असतात. सध्याच्या वातावरणात खराब हवा आणि प्रदूषणामुळे अस्थमा तसेच श्‍वसनाचे विकार असणाऱ्यांना श्‍वास घ्यायला त्रास होतो. अशावेळी कटुकच्या सेवनामुळे लाभ होऊ शकतो. अस्थमाच्या रुग्णांसाठी कटुक लाभदायी ठरू शकते.
ताप आल्यावर तुम्ही एखादी गोळी घेऊन झोपता. मात्र अशावेळी कटुकचे सेवन करता येईल. कटुकमुळे ताप उतरायला मदत होते. कटुकची पूड करून पाण्यासोबत घेता येईल. कटुकमुळे रोगप्रतिकारक शक्ती सुधारते आणि सर्दी, खोकला, ताप अशा आजारांपासून बचाव होतो.
कटुकमध्ये जखमा बऱ्या करण्याची क्षमता आहे. जंतुसंसर्ग, दुखापती बऱ्या करायच्या असतील तर हळदीप्रमाणेच कटुकही वापरता येईल.
यकृताचे आरोग्य राखण्यासाठीही कटुकचे सेवन करता येईल. हिमालयात आढळणारी ही वनौषधी यकृताचे कार्य सुधारते. यातल्या कुटकन नामक घटकामुळे विविध विकारांपासून यकृताचा बचाव होतो.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here