पुणे : संरक्षण क्षेत्रातील शस्त्रे, तंत्रज्ञान, साधन सामग्रींचा दर्जा आणि उत्पादन वाढविण्यासाठी देशातील आयुध निर्माण कारखाना बोर्डाचे (ओएफबी) ‘कंपनीकरण’ (कॉर्पोरेटायझेशन) केले आहे. यासाठी देशातील ४१ कारखान्यांची सात प्रकारांत विभागणी केली आहे. यामुळे संरक्षण उत्पादनात वाढ होत उत्पादनांच्या गुणवत्तेत सुधारणा होर्इल, असा विश्‍वास तज्ज्ञांनी व्‍यक्त केला आहे.

याबाबत संरक्षण विश्‍लेषक मेजर जनरल (निवृत्त) राजन कोचर यांनी सांगितले, ‘‘ओएफबीच्या खासगीकरणाची गरज ही १९९० च्या दशकात भासली होती. विविध समितींनी याबाबत अहवाल सादर केले. त्यानुसार केंद्र सरकारने यावर लक्ष केंद्रित करत आता एक ऑक्टोबरपासून ओएफबीचे कंपनीकरण केले आहे.’’

‘OFB’ चा इतिहास:

आयुध कारखान्यांची सुरवात भारतात सुमारे २०० वर्षांपूर्वी झाली. शस्त्र, दारू-गोळा यांचा निर्मितीसाठी हे कारखाने उभारले होते. ब्रिटिश सरकारने ओएफबीच्या माध्यमातून या साधनांचा वापर दुसऱ्या महायुद्धात केला. ओएफबीचे मुख्यालय हे कोलकता येथे असून, ब्रिटिश काळात येथून सहजपणे मध्य पूर्व आशिया, म्यानमारसह विविध भागांत सैन्याला साहित्य सामग्री पाठविण्यात येत होते.

शेकटकर समितीचा प्रस्ताव :

शेकटकर समितीमार्फत सर्वंकष अभ्यास करण्यात आला. त्यानुसार ओएफबीच्या कार्याचा आढावा घेत अहवाल सादर केला. यामध्ये आयुध निर्माण कारखान्यांचे खासगीकरण न करता त्यांचे कंपनीकरण करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. देशात असलेल्या ४१ आयुध कारखान्यातील ११ कारखाने पूर्णपणे बंद करण्याचा प्रस्ताव देखील मांडण्यात आला. या अकरा कारखान्यांत तयार होणाऱ्या उत्पादनाचा वापर कमी असून, त्यांची किंमत देखील जास्त आहे. याचीच दखल घेत केंद्र सरकारने ओएफबीचे कंपनीकरण केले, अशी माहिती लेफ्टनंट जनरल (निवृत्त) दत्तात्रेय शेकटकर यांनी दिली.

कंपनीकरणाच्या अनुषंगाने :

  • पुढील पाच वर्षांसाठी आयुध कारखान्यांची एकूण मागणी सुमारे ११ हजार कोटी रुपयांची

  • परिणामी सात उद्योगांपैकी काहींची क्षमता कमी वापरात राहील

  • संरक्षण क्षेत्राला देण्यात येणाऱ्या बजेटची करावी लागेल रचना

  • आयुध कारखान्यांचे सात वर्गांमध्ये केले विभाजन

  • त्यांचा ९५ टक्के महसूल अर्थसंकल्पावर अवलंबून

स्थायी समितीच्या संरक्षण २०२०च्या अहवालानुसार :

  • सध्याची ओएफबी क्षमता १७ हजार कोटी रुपये (जीएसटीसह) प्रति वर्ष ऑर्डरच्या किमतीपर्यंत मर्यादित

  • ऑर्डरचे सध्याचे मूल्य ९०० ते १२०० कोटी रुपयांदरम्यान

  • पाच वर्षांत यंत्रसामग्री, नूतनीकरण व कामाशी संबंधित आधुनिकीकरणावर ५,६०० कोटी खर्च

  • संशोधन आणि विकासावर खर्च झाला कमी, एकूण बजेटच्या ०.५ टक्के

  • निर्यातीचे मूल्य प्रति वर्ष सरासरी केवळ २०० कोटी

कंपनीकरणाचा असा होणार फायदा :

  • संरक्षण साहित्यांची गुणवत्ता वाढेल

  • वेळेची बचत होर्इल

  • आयातीचा खर्च कमी

  • निर्यातीच्या क्षेत्रातदेखील वाढ

  • ओएफबीचे सात प्रकारांत विभाजन

प्रकार : आयुध कारखान्यांची संख्या

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here