बॉलीवूडमध्ये एव्हरग्रीन अभिनेता म्हणून शम्मी कपूर यांचे नाव घेतले जाते. त्याचं दिसणं, अभिनय, हे सारं लाजवाब होतं. त्यामुळे ते प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. त्यांचा चाहतावर्ग प्रचंड होता. या अभिनेत्यानं त्यावेळी मोठा सुपरस्टार होण्याचा मान मिळवला होता. त्यांच्या बरोबरीच्या अभिनेत्यांच्या तुलनेत शम्मी कपूर फार पुढे निघून गेले होते. भारताचा एल्विस प्रिस्ले अशी त्यांची ओळख होती.

शम्मी कपूर यांनी शक्ति सामंत यांच्या सहा चित्रपटांमध्ये काम केले. त्या चित्रपटांची नावं पुढीलप्रमाणे – सिंगापूर. चायना टाऊन, कश्मिर की कली, अॅन इव्हेनिंग ऑफ पॅरिस, पगला कही का आणि जाने अंजाने.
शम्मी कपूर यांना दोन मुलं. पहिल्या पत्नीपासून झालेली ती दोन मुलं म्हणजे आदित्य राज कपूर आणि मुलगी कांचन.
शम्मी कपूर यांनी आपल्या कुटूंबासाठी एक स्वतंत्र वेबसाईट सुरु केली होती. त्या वेबसाईटचं नाव जंगली डॉट कॉ़म.
फिल्मीबाईटनं दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्री मुमताज यांनी सांगितलं होतं की, शम्मी कपूर यांना त्यांच्याशी लग्न करायचं होतं. मात्र त्यांनी त्याला नकार दिला. करिअरच्या कारणास्तव त्यांनी लग्नाला नकार दिला होता.
14 ऑगस्ट 2011 मध्ये मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात शम्मी कपूर यांचा मृत्यु झाला. क्रोनिक किडनीच्या विकारानं ते त्रस्त झाले होते. अखेर वयाच्या 79 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
शम्मी कपूर यांना 1968 मध्ये पहिल्यांदा फिल्म फेअरचं अवॉर्ड मिळालं ते ब्रम्हचारी चित्रपटासाठी. पीफ अर्थात पुणे इंटरनॅशलन फिल्म फेस्टिव्हलमध्ये त्यांना लाईफ टाईम अॅचिव्हमेंटनं सन्मानित करण्यात आले होते.

शम्मी कपूर यांनी आपल्या कुटूंबासाठी एक स्वतंत्र वेबसाईट सुरु केली होती. त्या वेबसाईटचं नाव जंगली डॉट कॉ़म.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here